शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

निधी उपलब्ध असूनही आरोग्य तपासणी शिबिरे होईनात

By admin | Updated: July 26, 2014 00:42 IST

हिंगोली : मानव विकास मिशनअंतर्गत हिंगोली, सेनगाव व औंढा नागनाथ तालुक्यात आरोग्य विभागाच्या वतीने बालमृत्यू व मातामृत्यू रोखण्यासाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्याकरीता

हिंगोली : मानव विकास मिशनअंतर्गत हिंगोली, सेनगाव व औंढा नागनाथ तालुक्यात आरोग्य विभागाच्या वतीने बालमृत्यू व मातामृत्यू रोखण्यासाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्याकरीता गतवर्षीचा १३ लाख रुपयांचा निधी शिल्लक असूनही ही शिबिरे घेण्याकरीता आरोग्य यंत्रणेने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. मानव विकास मिशन अंतर्गत जिल्ह्यातील हिंगोली, सेनगाव व औंढा नागनाथ या तीन तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. या तीन तालुक्यांतील बालमृत्यू व मातामृत्यू रोखण्यासाठी गर्भवती माता व कुपोषित बालकांची आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यासाठी शासनाकडून निधी दिला जातो. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राने एका महिन्यात दोन आरोग्य तपासणी शिबिरे घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यात अशी एकूण १२ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. गतवर्षी जिल्हा परिषदेला आरोग्य शिबिरे घेण्यासाठी देण्यात आलेल्या निधीपैकी १३ लाख रुपयांचा निधी अखर्चिक राहिला. हा निधी आरोग्य विभागाने मानव विकास मिशनला ३१ मार्चनंतर तात्काळ परत करावा, असे चार वेळा पत्र दिले; परंतु निधी परत करण्यात आला नाही. उलट निधी उपलब्ध नसल्याची कारण सांगून शिबीर घेण्यासही टाळाटाळ करण्यात आली. एप्रिल ते जून या कालावधीत औंढा तालुक्यात व सेनगाव तालुक्यात प्रत्येक दोन अशी केवळ चार आरोग्य शिबिरे घेण्यात आली आहेत. हिंगोली तालुक्याने तर अद्याप खातेच उघडलेले नाही. १२ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत दरमहा २४ शिबीर होणे आवश्यक आहे. एप्रिल ते जून या कालावधीत ३६ शिबिरे होण्याऐवजी केवळ ४ शिबिरे झाली, याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. निधी नसल्याचे कारण दिले जात असेल तर शिल्लक असलेला १३ लाख रुपयांचा निधी का खर्च केला नाही? असाही सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे गतवर्षीही आरोग्य विभागाच्या वतीने मानव विकास मिशन अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिरे घेण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यावरूनच आरोग्य विभाग या प्रश्नावर किती गंभीर आहे, हेच यावरून स्पष्ट होते. (जिल्हा प्रतिनिधी)