पोलीस उपआयुक्त ते आयुक्त; तब्बल १५ वर्षानंतर निखिल गुप्ता औरंगाबादेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 17:58 IST2020-09-03T17:54:12+5:302020-09-03T17:58:06+5:30
निखील गुप्ता हे २००३ ते २००५ या कालावधीत पोलीस उपायुक्तपदी कार्यरत होते.

पोलीस उपआयुक्त ते आयुक्त; तब्बल १५ वर्षानंतर निखिल गुप्ता औरंगाबादेत
औरंगाबाद: गुरुवारी विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. औरंगाबादचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची नागपूर परिक्षेत्राच्या महानिरीक्षकपदी बदली करण्यात आल्याने त्यांच्या रिक्तपदी निखील गुप्ता शहराचे नवे पोलीस आयुक्त म्हणून येत आहेत.
निखील गुप्ता हे २००३ ते २००५ या कालावधीत पोलीस उपायुक्तपदी कार्यरत होते. अत्यंत शिस्तप्रिय आणि धडाकेबाज पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. २००५ साली औरंगाबाद मधून ते सयुंक्त राष्ट्र संघटनेच्या शांतीसेनेत प्रतिनियुक्तीवर गेले होते. तेथून परत आल्यानंतर त्यांनी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून काम केले. यानंतर ते केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेले होते. सध्या ते हैदराबाद येथील आयपीएस ट्रेनिंग सेंटर येथे कार्यरत होते. प्रतिनियुक्तीचा पाच वर्षाचा कालावधी समाप्त झाल्यावर ते महाराष्ट्र केडर मध्ये परत आले. आज १५ वर्षानंतर गुप्ता औरंगाबादला पोलीस आयुक्तपदी बदली झाली.
उद्या होणार रुजू
शुक्रवारी औरंगाबाद पोलीस आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारणार असल्याचे निखील गुप्ता यांनी 'लोकमत' प्रतिनिधीस सांगितले.