शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘कन्या कल्याण’ योजनेस उदासीनता

By admin | Updated: June 30, 2014 00:38 IST

सितम सोनवणे , लातूर कुटुंबात १ अथवा २ मुलींवर कुटुंब नियोजन करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजना राबविण्यात येत आहे.

सितम सोनवणे , लातूरमहिलांचा सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी कुटुंबात १ अथवा २ मुलींवर कुटुंब नियोजन करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजना राबविण्यात येत आहे. मात्र ही योजना राबविण्यात स्थानिक प्रशासनाची उदासीनता आहे. सहा वर्षांत केवळ २६ लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळाला. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबासाठी ही योजना १९९५ मध्ये सुरू करण्यात आली. १९९६ मध्ये या योजनेत सुधारणा करण्यात आली. एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास २ हजार रुपये रोख व मुलीच्या नावे ८ हजारांचे बचत प्रमाणपत्र. दोन मुलींवर कुटुंब नियोजन केल्यास रोख २ हजार व प्रत्येकी मुलींच्या नावे ४ हजारांचे बचत प्रमाणपत्र असे स्वरूप या योजनेचे आहे. मात्र ही योजना दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे प्रस्तावाचे प्रमाण कमी आहे. २००८-०९ मध्ये तीन कुटुंबांंना, २००९-१० मध्ये पाच, २०१०-११ मध्ये एक, २०११-१२ मध्ये सहा, २०१२-१३ मध्ये तीन, २०१३-१४ मध्ये आठ अशा २६ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यांना शस्त्रक्रियेच्या वेळी रोख २ हजार व त्यांच्या मुलींच्या नावे बचत प्रमाणपत्र मिळाले आहे. २०१४-१५ सालात तर फक्त तीन प्रस्ताव आले आहेत. त्यातही त्रुटी आहेत. सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजनेची जनजागृती केली नसल्यामुळे लाभार्थ्यांचे प्रमाण नगण्य आहे. ग्रामीण स्तरावर जि.प.चा आरोग्य विभाग व शहरी स्तरावर न.प.च्या आरोग्य विभागातर्फे प्रस्ताव घेतले जातील. मात्र जि.प. व न.प.च्या आरोग्य विभागाची उदासीनता असल्यामुळे ही योजना कागदावरच राहत आहे. प्रसार करूनही प्रस्ताव अल्प..़सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजना प्रोत्साहन मिळावे म्हणून सुरू करण्यात आली आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील मुलींसाठी ही योजना आहे. योजना जुनी झाली आहे. प्रत्येकाला योजनेची माहिती आहे. तरीही प्रस्ताव कमी येत आहेत. चालू वर्षात तीन प्रस्ताव आले आहेत. त्यातील त्रुटी दुरुस्त करून संबंधितांना या योजनेचा लाभ मिळवून दिला जाईल, असे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी सांगितले.