शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

ठेवीसाठी महिलांची जिल्हा बँकेत धडक

By admin | Updated: July 4, 2014 00:14 IST

बीड: येथील जिल्हा बॅँकेत सामान्य ठेवीदारांचे तब्बल सातशे कोटी रुपये अडकलेले आहेत. अनेक ठेवीदार रुग्णालयात अंतीम घटका मोजत आहेत.

बीड: येथील जिल्हा बॅँकेत सामान्य ठेवीदारांचे तब्बल सातशे कोटी रुपये अडकलेले आहेत. अनेक ठेवीदार रुग्णालयात अंतीम घटका मोजत आहेत. अशापरिस्थितही बॅँक पैसे देत नसल्याने मनसे महिला आघाडीच्या सदस्यांनी बुधवारी रात्री जिल्हा बॅँकेवर धडक मारली. यावेळी आंदोलक महिलांना पोलीसांनी ताब्यात घेतले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकमध्ये महिला, वृद्ध, निराधार, निवृत्तीवेतनधारक आदींचे कोट्यवधी रुपये अडकलेले आहेत. हे पैसे ठेवीदारांना मिळत नसल्याने ठेवीदार अडचणीत आले आहेत. ठेवीदारांना त्यांचे पैसे द्यावेत यासाठी मनसे महिला जिल्हा आघाडीच्या अध्यक्षा रेखा फड यांनी बॅँकेचे प्रशासक मुकणे यांच्यासह जिल्हा उपनिबंधक यांना निवेदन दिले आहे. या संदर्भात बुधवारी आल्यावर चर्चा करतो, असे प्रशासक मुकणे हे म्हणाले रेखा फड यांना म्हणाले होते. बुधवारी फड यांनी अनेकदा मुकणे यांना फोन केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शेवटी रात्री आठच्या सुमारास बॅँकेत गेल्या. यावेळी येथील सुरक्षारक्षकांनी गेट उघडण्यास नकार दिला. यानंतर रेखा फड, दैवशाला शिंदे व अ‍ॅड. संगीता चव्हाण यांनी गेटवरून उडी मारून बॅँकेच्या आवारात प्रवेश केला. यावेळी शहर ठाण्याचे पोलीस दाखल झाले होते. यांनी तिनही महिलांना ताब्यात घेतले. यासंदर्भात रेखा फड म्हणाल्या की, प्रशासक मुकणे बॅँकेत आल्याची माहिती आपणास मिळाली होती. यावरून आपण निवेदन देण्यासाठी बॅँकेत गेलो होतो. या संदर्भात माहिती घेण्यासाठी मुकणे यांना भ्रमणध्वनी केला असता, संपर्क होऊ शकला नाही. तर, शहर ठाण्याचे या आंदोलनात समीना बेगम, मंगल गाढे, संगीता वाघमारे, अरूणा चौरे, ज्योती कांबळे या मनसेच्या महिला सदस्यांनीही सहभाग घेतला होता. नलिनी देशमुख यांना उपचारासाठी पैशांची गरजअंबाजोगाई येथील नलिनी देशमुख (६५) यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत. त्यांचे पती व मुलगा यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. नलिनी यांनाही कर्करोग आहे. त्यांच्या उपचारासाठी चार लाख रुपये खर्च असल्याचे पुण्यातील डॉक्टरांनी सांगितले आहे. नलिनी यांचे डीसीसीमध्ये ७ लाख रुपये आहेत. उपचारासाठी चार लाखांची मागणी मुकणे यांच्याकडे केल्याचे रेखा फड यांनी सांगितले. नलिनी देशमुख यांना वेळीच उपचार मिळावेत यासाठी बॅँकेने पैसे द्यावेत अशी मागणी फड यांनी केली. (प्रतिनिधी)