दिंड्यांना सहकार्य नाकारल्यामुळे वाद चिघळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 00:04 IST2019-06-18T00:03:17+5:302019-06-18T00:04:15+5:30
आषाढी एकादशीसाठी दरवर्षी पंढरपूरकडे जिल्ह्यातून ४५ दिंड्या प्रस्थान करीत असतात. जिल्हा परिषदेमार्फत दिंड्यांतील वारकऱ्यांना आरोग्य सेवा व पाण्याच्या टँकरचा पुरवठा केला जात असतो. मात्र, यंदा यासाठी जिल्हा परिषदेने अर्थसंकल्पात तरतूद केली नसल्यामुळे पदाधिकारी विरुद्ध प्रशासन अशा नव्या वादाला तोंड फुटले आहे.

दिंड्यांना सहकार्य नाकारल्यामुळे वाद चिघळला
औरंगाबाद : आषाढी एकादशीसाठी दरवर्षी पंढरपूरकडे जिल्ह्यातून ४५ दिंड्या प्रस्थान करीत असतात. जिल्हा परिषदेमार्फत दिंड्यांतील वारकऱ्यांना आरोग्य सेवा व पाण्याच्या टँकरचा पुरवठा केला जात असतो. मात्र, यंदा यासाठी जिल्हा परिषदेने अर्थसंकल्पात तरतूद केली नसल्यामुळे पदाधिकारी विरुद्ध प्रशासन अशा नव्या वादाला तोंड फुटले आहे.
यासंदर्भात जि. प. अध्यक्षा देवयानी पाटील डोणगावकर व अर्थ तथा बांधकाम समितीचे सभापती विलास भुमरे यांनी सोमवारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गिते, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अप्पासाहेब चाटे यांना जाब विचारला. उद्या मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांना याबाबत विचारणा केली जाणार असल्याचे या दोघांनी सांगितले. दिंड्यांतील वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी दरवर्षी जिल्हा परिषदेची एक रुग्णवाहिका, एक डॉक्टर, औषधांचा पुरवठा केला जातो, तर पाणीपुरवठा विभागामार्फत पाण्याचे टँकर दिले जाते. यासाठी जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पात आरोग्य विभाग व पाणीपुरवठा विभागाच्या लेखाशीर्षमध्ये प्रत्येकी १० ते १५ लाखांची तरतूद केली जाते.
सभापती विलास भुमरे यांनी सांगितले की, लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे यंदाचा अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी तयार केला. मागील वर्षी आम्ही अर्थसंकल्प सादर केला होता. तेव्हा अर्थसंकल्पात दिंड्यांसाठी वाढीव तरतूद करण्यात आली होती. यावर्षीच्या अर्थसंकल्पात दिंड्यांना सहकार्य करण्यासाठी प्रशासनाने उदासीन भूमिका घेतली. आरोग्य पथक व पाण्याच्या टँकरसाठी तरतूद न केल्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाप्रती सदस्य, पदाधिकारी व वारकºयांमध्ये असंतोष पसरला आहे. दिंड्यांना देण्यात येणाºया सुविधांसाठी तरतूद करण्यात येणाºया निधीला प्रशासनाने यंदा जाणीवपूर्वक कात्री लावली, असा आरोप भुमरे यांनी केला आहे.
चौकट ....
तात्काळ निधीतून दहा लाखांची तरतूद
यासंदर्भात आरोग्य सभापती मीना शेळके यांनी सांगितले की, जिल्ह्यातून जाणाºया दिंड्यांसाठी यंदा अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेली नाही. जिल्ह्यातून दरवर्षी ४० ते ४५ दिंड्या पंढरपूरकडे प्रस्थान करीत असतात. दिंड्यांतील वारकºयांच्या आरोग्याची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी पवनीत कौर यांच्यासोबत चर्चा केली. तेव्हा त्यांनी आरोग्य सुविधांसाठी अति तात्काळ निधीतून १० लाखांची तरतूद करण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे यंदाही दिंड्यांसोबत आरोग्य पथक रवाना होईल.
------------