शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

छावणी परिषदेच्या सीईओंनाच डेंग्यू

By admin | Updated: December 15, 2014 00:51 IST

औरंगाबाद : छावणीत मागील काही दिवसांपासून डेंग्यूच्या आजाराने सर्वत्र हात-पाय पसरले आहेत.

औरंगाबाद : छावणीत मागील काही दिवसांपासून डेंग्यूच्या आजाराने सर्वत्र हात-पाय पसरले आहेत. खुद्द छावणी परिषदेचे मुख्याधिकारी विनीत लोटे हेही सध्या डेंग्यूसदृश तापाने आजारी असून त्यांच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे छावणीतील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. छावणी परिषदेतर्फे साफसफाई आणि कचरा उचलण्याचे कंत्राट खाजगी व्यक्तींना देण्यात आलेले आहे. तरीही ठिकठिकाणी कचरा आणि घाण साचत आहे. शिवाय अनेक ठिकाणी पाण्याची डबकीही साचत आहेत. या सर्वांवर डासांची मोठ्या प्रमाणावर उत्पत्ती होत आहे. त्यामुळे परिसरात गेल्या काही दिवसांपासून तापेच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. छावणीतील दानाबाजार, तोफखाना बाजार, गवळीपुरा, पेन्शनपुरा, गड्डीगुडम, कर्णपुरा आदी भागांतून तापेचे रुग्ण छावणीच्या सरकारी रुग्णालयात येत आहेत. यातील अनेक रुग्ण डेंग्यूसदृश तापेचे असून त्यांना छावणीच्या रुग्णालयातून घाटी रुग्णालयात पाठविले जात आहे.या आजारांची लागण केवळ सामान्य नागरिकांपर्यंत नाही, तर आता ती छावणी परिषदेच्या अधिकाऱ्यांपर्यंतही पोहोचली आहे. छावणी परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनीत लोटे हेही काही दिवसांपासून तापेने आजारी आहेत. त्यांनाही डेंग्यूसदृश ताप असल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे सध्या त्यांना शहरातील एका मोठ्या खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आलेले असून तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.