शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

औंढ्यातही डेंग्यूची भीती

By admin | Updated: September 11, 2014 00:00 IST

औंढा नागनाथ : डेंग्यूची साथ पसरल्याने खुद्द औरंगाबाद येथील आरोग्य सहसंचालक यांनी या गावांना भेटी देऊन साथरोग नियंत्रित करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.

औंढा नागनाथ : तालुक्यातील पिंपळदरी, काकडदाभासह औंढा शहरात डेंग्यूची साथ पसरल्याने खुद्द औरंगाबाद येथील आरोग्य सहसंचालक यांनी या गावांना भेटी देऊन साथरोग नियंत्रित करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. पिंपळदरी येथे पुन्हा नव्याने फेरसर्वेक्षण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. पिंपळदरी येथे मागील १० दिवसांपासून डेंग्यूच्या तापाची साथ सुरू आहे. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी तालुका व जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. परंतु स्थानिक आरोग्य कर्मचारी त्याला प्रतिसाद देत नसल्याने या ठिकाणची साथ आटोक्यात येत नव्हती. त्याचप्रमाणे औंढा व काकडदाभा या ठिकाणी डेंग्यूचा एक-एक रूग्ण आढळून आला होता. या संदर्भात ‘लोकमत’ ने वृत्त प्रसिद्ध करताच विभागीय आरोग्य सहसंचालक एस.व्ही. देशपांडे यांनी याची गंभीर दखल घेत थेट पिंपळदरी गाठले. दुपारी ४ वाजता त्यांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन गावात निर्माण झालेल्या साथीच्या सर्वेक्षण अहवालाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत साथरोग पर्यवेक्षक के.व्ही. घुगे, के.एस. शेळके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश गायकवाड होते. यावेळी संचालक देशपांडे यांनी सोबत स्वतंत्र टिम आणली होती. त्यांनी गावामधील १० टक्के घरांचा सर्वेक्षण केला. यामध्ये आतून उपाययोजना करून पुर्नसर्वेक्षण करण्याची गरज असल्याने देशपांडे यांनी या ठिकाणी दुबार सर्वेक्षण करण्याचा सूचना हिवताप व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्याच प्रमाणे साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. औंढा व काकडदाभा येथे बुधवारी सायंकाळी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच वसंत मुळे, ग्रामविकास अधिकारी रमेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली काही भागामध्ये धूर फवारणी करण्यात आली. गुरूवारी आरोग्य विभागाच्या वतीने ‘डोअर टू डोअर’ जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी गायकवाड व वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंगेश टेहरे यांनी दिली.(वार्ताहर)