शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
3
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
4
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
5
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
6
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
7
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
8
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
9
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
10
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
11
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
12
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
13
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
14
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
15
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
16
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
17
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
19
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
20
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
Daily Top 2Weekly Top 5

दानवेंमुळे मानेंची अडचण वाढली

By admin | Updated: August 2, 2014 01:43 IST

लालखाँ पठाण, गंगापूर गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवारात रस्सीखेच वाढत असल्याने प्रमुख दावेदार माजी आ. अण्णासाहेब माने अडचणीत सापडले आहेत.

लालखाँ पठाण, गंगापूरगंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवारात रस्सीखेच वाढत असल्याने प्रमुख दावेदार माजी आ. अण्णासाहेब माने अडचणीत सापडले आहेत.गंगापूर विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेतर्फे नवीन चेहऱ्याला संधी मिळणार. नव्या चेहऱ्याच्या शोधात असतानाच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांचे नाव शिवसेनेच्याच सक्रिय गोटातून पुढे येत असल्याने माने यांना तालुक्यातूनच समर्थन मिळत नसल्याने ते एकाकी पडल्याचे पदाधिकाऱ्यांतून बोलले जात आहे. तर लोकसभा निवडणुकीत देशात भाजपाची सत्ता आल्यामुळे आणि आतापर्यंत तालुक्यात शिवसेनेचाच उमेदवार लादल्याने भाजपा कार्यकर्त्यांचा नुसता वापर झाल्याची भावना भाजपा गोटात आहे. त्यामुळे या खेपेला भाजपाही निवडणूक रिंगणात उतरून तिकिटावर आपला हक्क सांगणार आहे. उमेदवारी मिळावी याकरिता भाजपाचे नेते किशोर धनायत तालुक्यात दौरे करून चाचपणी करताना दिसत आहे.गंगापूर-खुलताबाद तालुक्यात शिवसेनेची ताकद मोठी आहे. मतदारही शिवसेनेला अनुकूल आहेत; परंतु माने यांच्या कार्यपद्धतीवर शिवसेनेत मोठी नाराजी आहे अनेकजण उघडपणे ही नाराजी बोलून दाखविताना आढळून येत असून माने यांना उमेदवारी दिल्यास जरा जडच जाईल अशी चर्चा आहे. या ठिकाणी शिवसेनेतर्फे नवीन चेहरा दिला तरच विजयाची खात्री शिवसैनिकांतून घेतली जाते.तालुक्यात शिवसेनेची भरभक्कम फळी आहे. शिवाय मजबूत संघटन व मतदारांचा बदलत असलेला कल पाहून आता औरंगाबाद शहरासह तालुक्यातील नवख्या शिवसैनिकांनीही उमेदवारीवर हक्क बजावण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे संघटनेच्या प्रमुख नेत्यांनीच सर्वांना मागे टाकीत आपणच उमेदवारी घेणार असा पवित्रा घेतला आहे. शिवसेनेची उमेदवारी आपल्याच खिशात असल्याचा देखावा करण्यात अंबादास दानवेंनी आघाडी घेतली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवसेना संघटनेचे जुने नवे हितचिंतक, सर्वच समर्थकांची मोट बांधून दानवे आपला आमदारकीचा रस्ता मोकळा करून माने यांना साफ करणार असल्याचे चित्र आता तालुक्यात उभे राहिले असून, यामुळे माने यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे.