एमआयएमची जास्त जागांची मागणी;प्रकाश आंबेडकर-ओवेसींची बैठक निष्फळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 17:06 IST2019-08-26T16:50:33+5:302019-08-26T17:06:00+5:30

तब्बल तीन तास एका बंद खोलीत झाली बैठक

Demand for more seats by AIMIM; Prakash Ambedkar and Owaisi meeting unsuccessful | एमआयएमची जास्त जागांची मागणी;प्रकाश आंबेडकर-ओवेसींची बैठक निष्फळ

एमआयएमची जास्त जागांची मागणी;प्रकाश आंबेडकर-ओवेसींची बैठक निष्फळ

ठळक मुद्दे वंचित आघाडी कडून स्वतः प्रकाश आंबेडकर तर एमआयएम पक्षातर्फे असादुद्दीन ओवेसी उपस्थित

औरंगाबाद : बहुजन वंचित आघाडी आणि एमआयएम पक्षाची आज पुण्यात बैठक घेण्यात आली. बैठक वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी झाली. बैठकीत महाराष्ट्रातील विधानसभेच्या जागांवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. मात्र, बैठकीत जागा वाटपाचा कोणत्याही ठोस निर्णय झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

एमआयएम पक्षाला किती जागा हव्या आहेत आणि त्या कोणकोणत्या यावर आज पुण्यात प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी बहुजन वंचित आघाडी आणि एमआयएम पक्षाची एक बैठक घेण्यात आली. मागील विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाने ज्या जागा लढविल्या होत्या त्यापेक्षा जास्त जागांची मागणी करण्यात आली आहे. मात्र जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब झाला नाही. तब्बल तीन तास ही बैठक एका बंद खोलीत झाली. वंचित आघाडी कडून स्वतः प्रकाश आंबेडकर तर एमआयएम पक्षातर्फे असादुद्दीन ओवेसी उपस्थित होते.

औरंगाबाद-अकोल्यावर एमआयएमचा दावा 

एमआयएमकडून औरंगाबादच्या तिनही मतदारसंघांवर दावा करण्यात आला. त्यामुळे आंबेडकर लवकरच जागांची घोषणा करण्याची चर्चा होती. त्याची कुणकुण खा. ओवेसी यांना लागली. त्यांनी बंद लिफाफ्यात एक पत्र विशेष दूतामार्फत मागील आठवड्यात पाठविले. यानंतर आज पुण्यात दोन्ही पक्षांमध्ये विधान सभेच्या २८८ जागांवर चर्चा झाली. गेल्या विधानसभेत एमआयएमने ज्या जागा लढविल्या होत्या, त्या जागा कायम राहतील. या शिवाय आणखी काही महत्त्वपूर्ण मुस्लिमबहुल मतदारसंघांवर एमआयएमने दावा केला आहे. याशिवाय अकोला विधानसभा मतदारसंघ एमआयएमला हवा आहे अशी माहिती आहे.

वंचितकडून मुस्लीम मतांसाठी व्यूव्हरचना

मुस्लिम समाजालाही वंचितमध्ये मानाचे स्थान देण्याचे काम आंबेडकर यांनी काही दिवसांपासून सुरू केले आहे. औरंगाबादेतील राष्ट्रवादीच्या तीन माजी नगरसेवकांना त्यांनी गेल्या आठवड्यात प्रवेश दिला. त्यामुळे भविष्यात एमआयएम पक्ष सोबत नसला तरी वंचितला फारसा फरक पडू नये, अशी व्यूव्हरचना आखण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत होते.

Web Title: Demand for more seats by AIMIM; Prakash Ambedkar and Owaisi meeting unsuccessful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.