एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:02 AM2020-12-22T04:02:01+5:302020-12-22T04:02:01+5:30

------------ ‘आरटीओ’ करणार वाहनांचा लिलाव औरंगाबाद : आरटीओ कार्यालयाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई केली आहे. अशी वाहने ...

Demand for merger of ST Corporation with the government | एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याची मागणी

एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याची मागणी

googlenewsNext

------------

‘आरटीओ’ करणार वाहनांचा लिलाव

औरंगाबाद : आरटीओ कार्यालयाने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई केली आहे. अशी वाहने आरटीओ कार्यालयाच्या आवारात उभी आहेत. वर्षानुवर्षे वाहन सोडविण्यासाठी वाहनधारक येत नाहीत. त्यामुळे अनेक वाहने भंगार झाली आहेत. अशा वाहनांचा लवकरच लिलाव केला जाणार आहे.

समर्थनगर येथील धाेकादायक

खांब हटविण्याची मागणी

औरंगाबाद : क्रांतीचौक पोलीस ठाण्याकडून समर्थनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर धोकादायक अवस्थेत टेलीफोन खांब वाकला आहे. हा खांब कोसळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा खांब तात्काळ हटविण्याची मागणी परिसरातील नागरिकांतून होत आहे.

रेल्वेस्टेशनवरील बसथांब्याला रिक्षांचा विळखा

औरंगाबाद : रेल्वेस्टेशनच्या आवारात स्मार्ट सिटी बसचा थांबा आहे. या थांब्याला सध्या रिक्षांचा विळखा पडला आहे. बसच्या प्रतीक्षेत असणाऱ्या प्रवाशांना ‘कुठे जायचे’ अशी विचारणा करीत रिक्षाचालक मागे लागतात. ये-जा करणाऱ्या शहरबसलाही रिक्षांच्या अडथळ्याला सामोरे जावे लागत आहे.

सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवा

औरंगाबाद : सेवानिवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे रजेची, कराराची थकबाकी मिळालेली नाही. त्यांना एक महिन्याऐवजी सहा महिन्यांचा पास देण्यात यावा, शिवशाही, सेमी लक्झरी बसमध्येही मोफत प्रवासाची परवानगी देण्यात यावी, आदी मागण्या निवेदनाद्वारे राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेने एसटी महामंडळाकडे केल्या आहेत. निवदेनावर विभागीय सचिव सय्यद हमीद यांचे नाव आहे.

Web Title: Demand for merger of ST Corporation with the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.