खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी शनिवारी भेट देऊन कोरोनाबाबत आढावा घेतला. यावेळी नगराध्यक्ष ॲड. एस. एम. कमर यांनी, खुलताबाद शहर हे धार्मिक व पर्यटनस्थळ असून या ठिकाणी नेहमी पर्यटक व भाविकांची गर्दी असते. खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त असून या ठिकाणी रिक्त असलेली पदे भरण्यात यावीत, तसेच रुग्णालयात उपचारासाठी आधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी केली.
यावेळी तहसीलदार सुरेंद्र देशमुख, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण शिंदे, गटविकास अधिकारी प्रवीण सुरडकर, पोलीस निरीक्षक सीताराम मेहत्रे उपस्थित होते.
फोटो कॅप्शन :
खुलताबाद ग्रामीण रुग्णालयात सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याकडे करताना नगराध्यक्ष ॲड. एस. एम. कमर.