शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

कोटीवर मागणी; १४ लाखांत बोळवण

By admin | Updated: August 17, 2015 01:05 IST

बीड : २५ टक्के मोफत प्रवेश देणाऱ्या कायम विनाअनुदानीत संस्थांचे एक कोटीवर शुल्क दोन वर्षांपासून थकीत आहे. शासनाने मात्र, केवळ १४ लाख रुपये देऊन बोळवण केली आहे.

बीड : २५ टक्के मोफत प्रवेश देणाऱ्या कायम विनाअनुदानीत संस्थांचे एक कोटीवर शुल्क दोन वर्षांपासून थकीत आहे. शासनाने मात्र, केवळ १४ लाख रुपये देऊन बोळवण केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विनाअनुदानीत संस्थांची फरफट ‘कायम’ आहे.बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार २०१२ पासून वंचित व दुर्बल घटकांतील बालकांना सर्वच शाळांमध्ये २५ टक्के प्रवेश मोफत दिले जातात. जिल्हा परिषद व अनुदानीत शाळांना शासन निधी पुरविते. त्यामुळे कायम विनाअनुदानीत संस्थेत २५ टक्के मोफत प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला शासनाकडून १३ हजार ४०० रुपये किंवा शाळेने निश्चित केलेले शुल्क यापैकी जी रक्कम कमी आहे ती देण्याची तरतूद आहे. पहिल्या वर्षी एकाही विद्यार्थ्याचा प्रवेश वेळेत होऊ शकले नाहीत. २०१३- १४ या शैक्षणिक वर्षात ३९ कायम विनाअनुदानीत शाळांनी ३१६ विद्यार्थ्यांना आरटीईनुसार २५ टक्के मोफत प्रवेश दिले होते. या विद्यार्थ्यांचे शासनाकडून ४२ लाख ३४ हजार ४०० रुपये इतके शुल्क येणे अपेक्षित होते. जि.प. शिक्षण विभागाने तशी मागणीही राज्याच्या शिक्षण विभागाकडे नोंदविली होती. मात्र, शासनाने नुकतेच १३ लाख ७३ हजार ४०८ रुपये इतका निधी बीडला पाठविला आहे. २०१४- १५ मध्ये ६५ कायम विनाअनुदानीत शाळांनी ५०६ मोफत प्रवेश दिलेले आहेत. या विद्यार्थीसंख्येनुसार ६७ लाख ८० हजार ४०० रुपये येणे गरजेचे आहे. मात्र, २०१३-१४ या शैक्षणिक वर्षातच तोकडे शुल्क मिळाले आहे. (प्रतिनिधी)निधीचे समप्रमाणात वाटप२०१३- १४ या शैक्षणिक वर्षात ४२ लाखावर निधी मिळणे आवश्यक होते;परंतु केवळ १३ लाख ७३ हजार रुपये आल्याने शिक्षण विभागापुढेही पेच होता. शेवटी विद्यार्थीसंख्येनुसार ३६ शाळांना समप्रमाणात निधी वाटप करण्यात आला. गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत निधी संबंधित शाळांच्या खात्यावर वर्ग करण्यात आला असल्याचे विस्तार अधिकारी जी. एन. चोपडे म्हणाले.२०१३ या शैक्षणिक वर्षात मागणी केल्यानुसार निधी आला नाही हे खरे आहे. यासंदर्भात आम्ही शासनाला कळविले आहे. मागील शिल्लक व २०१४ मधील मोफत प्रवेशाचे शुल्क मिळावे, यासाठी पत्रव्यवहार सुुरु आहे.- शशीकांत हिंगोणेकर, शिक्षणाधिकारी (प्रा.)