शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता 
2
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
3
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
4
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
5
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
6
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
7
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
8
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
9
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
10
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
11
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
12
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
13
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
14
Rahul Gandhi: "मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
15
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
16
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
17
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
18
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
19
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट

शहरातील घन कचऱ्याच्या व्यवस्थापना संदर्भातील अवमान याचिकेत महापौरही प्रतिवादी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:49 IST

शहरातील घन कचऱ्याच्या व्यवस्थापनासंदर्भात गेल्या सहा महिन्यांपासून खंडपीठाने वारंवार निर्देश दिले आहेत. असे असताना अद्यापही ओला-सुका कचरा वेगळा न करता वाहून नेला जात असल्याबाबत न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. व्ही.के. जाधव यांच्या खंडपीठाने गुरुवारी (दि.१६) सक्त नाराजी व्यक्त केली.

ठळक मुद्देनाराजीचा सूर : घनकचरा व्यवस्थापनात मनपाला सूचना

औरंगाबाद : शहरातील घन कचऱ्याच्या व्यवस्थापनासंदर्भात गेल्या सहा महिन्यांपासून खंडपीठाने वारंवार निर्देश दिले आहेत. असे असताना अद्यापही ओला-सुका कचरा वेगळा न करता वाहून नेला जात असल्याबाबत न्या. एस.एस. शिंदे आणि न्या. व्ही.के. जाधव यांच्या खंडपीठाने गुरुवारी (दि.१६) सक्त नाराजी व्यक्त केली. सदर बाब अत्यंत गंभीर असून, याविषयी त्वरित योग्य ती काळजी घेण्याचे खंडपीठाने महापालिकेला सूचित केले.

कांचनवाडी येथील याचिकाकर्त्यांनी महापौरांना प्रतिवादी करण्याची विनंती केली असता खंडपीठाने ती मान्य केली. तसेच अवमान याचिकेतही महापौरांना प्रतिवादी का करू नये, अशा आशयाची नोटीस काढली. कच-याविषयक सर्वच याचिकांवर २१ आॅगस्टला एकत्रित सुनावणी होणार आहे. ७५ टक्केओला आणि सुका कचरा वेगळा करूनच वाहून नेला जात असल्याचा महापालिकेचा दावा फोल आहे. अद्यापही शहरातून विलगीकरण न केलेला कचरा एकत्रित करूनच वाहून नेला जात असल्याचे सर्वच याचिकाकर्त्यांनी सुनावणीवेळी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. इतकेच नव्हे तर त्यांनी शहरातील विविध भागांतून एकत्रित कचरा वाहून नेला जात असल्याची छायाचित्रे खंडपीठात सादर केली. त्यावर खंडपीठाने सक्त नाराजी व्यक्त केली. याविषयी दावे आणि प्रतिदावे केले जात असल्यामुळे सरकारी वकिलांनी वकिलांचा एक गट तयार करून शहरातील परिस्थितीचा वस्तुनिष्ठ ‘आँखो देखा हाल’ न्यायालयापुढे आणावा, असेही खंडपीठाने सूचित केले.

मिटमिट्यात कचरा प्रक्रिया नाहीचमहापालिकेने पडेगाव येथील जागेबाबत शपथपत्र दाखल केले, तर अवमान याचिकेत याचिकाकर्त्याने दिवाणी अर्ज दाखल करून महापौरांना प्रतिवादी करण्याची विनंती केली. हर्सूल येथील जागेसंदर्भात याचिकाकर्त्याने शपथपत्र दाखल केले. महापालिकेने कचºयावर प्रक्रिया करण्यासाठी निश्चित केलेल्या जागांमध्ये मिटमिट्याचा समावेश नाही. त्यामुळे मिटमिटा येथील सफारीपार्कच्या जागेवर कचरा प्रक्रिया कें द्र उभारू नये, अशी विनंती करणारी याचिका खंडपीठाने निकाली काढली. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. देवदत्त पालोदकर, विजयकुमार सपकाळ आणि प्रज्ञा तळेकर, मनपातर्फे अ‍ॅड. राजेंद्र देशमुख, शासनातर्फे अ‍ॅड. अमरजितसिंह गिरासे, केंद्रातर्फे अ‍ॅड. संजीव देशपांडे यांनी काम पाहिले.

‘मीडिया हॅज मेड अ‍ॅन एक्सलन्ट जॉब’अमरावती महापालिकेने सुमारे तीन वर्षांपूर्वी ‘ब्लॅक लिस्ट’ केलेल्या मायोवेसल कंपनीला महापालिकेने शहरातील ३०० मेट्रिक टन कचºयावर प्रक्रिया करण्याचे काम दिल्याची बाब ‘लोकमत’ने निदर्शनास आणल्याबद्दल ‘मीडिया हॅज मेड अ‍ॅन एक्सलन्ट जॉब’ अशा शब्दांत खंडपीठाने त्या वृत्ताची दखल घेतली.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्नAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ