शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

उपनगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम जाहीर

By admin | Updated: June 24, 2014 00:31 IST

उस्मानाबाद : जिल्ह्यातील आठ नगर पालिकेच्या उपाध्यक्षपदाचा अडीच वर्षाचा कालावधी २५ जून रोजी पूर्ण होत आहे.

उस्मानाबाद : जिल्ह्यातील आठ नगर पालिकेच्या उपाध्यक्षपदाचा अडीच वर्षाचा कालावधी २५ जून रोजी पूर्ण होत आहे. या अनुषंगाने नवीन उपनगराध्यक्ष निवडीसाठी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी गुरूवारी संबंधित नगर परिषदेत विशेष सभांचे आयोजन केले आहे.जिल्ह्यातील सर्वच नगरपरिषदांच्या उपाध्यक्षांची निवड २६ डिसेंबर २०११ च्या पहिल्या विशेष सभेत करण्यात आली होती. त्यांचा पदावधी २५ जून २०१४ रोजी पूर्ण होत आहे. उस्मानाबाद, तुळजापूर, नळदुर्ग, उमरगा , मुरुम, कळंब , भूम व परंडा या आठ पालिकांच्या उपाध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी प्रशांत नारनवरे यांनी नुकताच जाहीर केला आहे. यासाठी २६ जून रोजी संबंधित नगर परिषदेत उपाध्यक्ष निवडीसाठी बैठक बोलाविण्यात आली आहे. या विशेष सभेचे अध्यक्ष पिठासीन अधिकारी म्हणून संबधित तहसीलदार यांना प्राधिकृत करण्यात आले आहे.असा आहे निवडणूक कार्यक्रमउपनगराध्यक्ष पदासाठी इच्छूक उमेदवारांना सकाळी १०.३० दुपारी १२.३० या वेळेत नामनिर्देशनपत्र सादर करता येतील. दुपारी १२.३० ते १ या वेळेत नामनिर्देशन पत्राची छाननी होणार असून, वैध उमेदवारांची नावे १.१० वाजता वाचून दाखविली जाणार आहेत. दुपारी १.१५ ते १.३० या वेळेत उमेदवारी मागे घेता येणार असून, यानंतर १.३५ वाजरता निवडणूक प्रक्रियेस प्रारंभ होणार आहे.(प्रतिनिधी)कळंबच्या निवडीला स्थगितीकळंब- कळंबच्या उपनगराध्यक्षपदासाठी २६ जून रोजी होणाऱ्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. कळंबचे उपनगराध्यक्ष पांडुरंग कुंभार यांनी नगराध्यक्षपदासारखेच उपनगराध्यक्षपदाच्या निवडीला स्थगिती द्यावी, यासाठी अ‍ॅड. उत्तमराव बोंदर यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. याची सुनावणी खंडपीठाचे न्या. आर. एम. डोई व न्या. व्ही. एल. अचलिया यांच्यासमोर झाली. यावेळी खंडपीठाने पुढील आदेश येईपर्यंत या निवडीला स्थगिती देण्याचे आदेश दिल्याची माहिती अ‍ॅड. उत्तम बोंदर यांनी दिली. दरम्यान न्यायालयाच्या या आदेशाने न. प. वर्तुळात तापलेले राजकीय वातावरण सध्यातरी थंड झाले आहे. कळंब न. प. मध्ये सध्या सेना, काँग्रेस युती आहे. न. प. मध्ये काँग्रेस पूर्ण बहुमत असल्याने काँग्रेसच्या नगरसेवकाला यंदा उपनगराध्यक्षपदासाठी संधी दिली जाणार होती.