शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
3
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

पानसरे-कडवकर यांच्यात वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 00:36 IST

खा.राहुल गांधी यांच्या सभेच्यावेळी व्यासपीठाच्या पाठीमागील बाजुस अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे व तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्यामध्ये चांगलाच वाद झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : खा.राहुल गांधी यांच्या सभेच्यावेळी व्यासपीठाच्या पाठीमागील बाजुस अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे व तहसीलदार विद्याचरण कडवकर यांच्यामध्ये चांगलाच वाद झाला.या संदर्भात बोलताना तहसीलदार कडवकर म्हणाले की, व्यासपीठाच्या पाठीमागे असताना पोलीस कर्मचाºयाने आपणास ओळखपत्र विचारले, आपण ते दाखविले. तेव्हा त्या कर्मचाºयाने आत जाण्यास सांगितले. शिवाय राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीच्या अधिकाºयांनीही आतमध्ये जाण्यास परवानगी दिली; परंतु, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी आपणास आत जाण्यापासून मज्जाव केला. त्यांना ओळख सांगून ओळखपत्र दाखवूनही ज्यांनी ओळखपत्र दिले, त्यांच्याशी बोला, असे सांगून अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली व शर्टला धरुन तेथून बाजुला काढले. यासंदर्भात जिल्हाधिकाºयांकडे तक्रार करणार असल्याचे कडवकर म्हणाले.याबाबत अतिरिक्त पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, तहसीलदार कडवकर हे मूळातच सभास्थळी उशिरा आले. व्हीव्हीआयपींसाठी असलेल्या व ज्या मोजक्याच पदाधिकाºयांना राहुल गांधी यांच्या सोबत व्यासपीठावर जायचे होते, त्यांच्यासाठी असलेल्या प्रवेशद्वारातून कडवकर जाण्याचा प्रयत्न करु लागले. जात असताना इतर दोन-तीन जणांना ते पदाचा दूरुपयोग करुन घेऊन जात होते. त्यामुळे त्यांना याबाबत विचारणा केली.राष्ट्रीय सुरक्षा अधिकाºयांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी यापूर्वीच त्यांच्या कार्यालयाचे एक नायब तहसीलदार दंडाधिकारी म्हणून उपस्थित असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना त्या प्रवेशद्वारातून जाता येणार नाही, असे सांगितले. मी ही वरिष्ठ अधिकारी असल्याने इतर अधिकाºयांशी कसा संवाद साधावा, याबाबतचे तारतम्य आपणास आहे. त्यामुळे त्यांच्याशी गैरवर्तन केले नाही. ते खोटं बोलत आहेत, असे पानसरे म्हणाले.दरम्यान, दोन वरिष्ठ अधिकाºयांमधील वादाच्या या घटनेमुळे उपस्थित महसूल व पोलीस कर्मचारीही चांगलेच चकित झाल्याचे पहावयास मिळाले. या संदर्भात जिल्हा कचेरीत महसूल विभागातील कर्मचारी व अधिकाºयांची बैठकही झाल्याचे समजते.