अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार सुरक्षा रक्षकाचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 16:47 IST2019-06-07T16:45:14+5:302019-06-07T16:47:20+5:30

तीन दिवसांपूर्वी याच मार्गावर कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला होता

Death of a two-wheeler in an unknown vehicle hit | अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार सुरक्षा रक्षकाचा मृत्यू 

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार सुरक्षा रक्षकाचा मृत्यू 

लासूर स्टेशन (औरंगाबाद ) : अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वाराचा गुरुवारी मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास जागीच मृत्यू झाला. ही घटना नागपूर-मुंबई महामार्गावर पोळ रांजनगाव शिवारात घडली. विजय फुलसिंग जारवाल (32 रा. जमनवाडी ता. वैजापुर ) असे मृताचे नाव असून तो एका खाजगी कंपनीमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत असे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, विजय हा एका खाजगी कंपनीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून होता. गुरुवारी मध्यरात्री तो काम संपवून दुचाकीवर ( एमएच 20 बी यू 594 ) घराकडे निघाला. १.३० वाजेच्या दरम्यान पोळ रांजणगाव शिवारात विजयाचा दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यात विजय गंभीर जखमी झाला. पोलीस मित्र कैलास कुऱ्हाडे यांनी दिलेल्या माहितीनंतर पोलीस निरीक्षक बालक कोळी, आप्पासाहेब काळे, विनोद बिघोत घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विजयला लासुर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. दरम्यान, तीन दिवसांपूर्वी याच मार्गावर कारने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोघांचा मृत्यू झाला. 

Web Title: Death of a two-wheeler in an unknown vehicle hit