शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

मेंदूत रक्तस्रावाने शिक्षकाचा मृत्यू

By admin | Updated: January 23, 2015 00:57 IST

सिल्लोड : पानवडोद येथील एका संस्थेत १४ वर्षे सेवा करूनही वेतन न मिळाल्याने तसेच सेवापदाला सरकारी मंजुरी न मिळाल्याने उपासमारीची वेळ आलेल्या एका शिक्षकाचा

सिल्लोड : पानवडोद येथील एका संस्थेत १४ वर्षे सेवा करूनही वेतन न मिळाल्याने तसेच सेवापदाला सरकारी मंजुरी न मिळाल्याने उपासमारीची वेळ आलेल्या एका शिक्षकाचा मेंदूत रक्तस्राव व पक्षाघात होऊन मृत्यू होण्याची घटना घडली. या प्रकरणी संबंधित संस्थाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेत मरण पावलेल्या शिक्षकाचे नाव पुंडलिक गणपत दांडगे (वय ४५, रा. जळकीबाजार, ह.मु. पानवडोद, ता.सिल्लोड) असे असून ते पानवडोद येथील स्वा.सै.कै. गंगारामजी मानकर प्राथमिक विद्यालयात गेल्या १४ वर्षांपासून नोकरीस होते; पण या शिक्षकास १०० टक्के अनुदान असताना संस्थाचालकाने आतापर्यंत एक रुपयाही वेतन दिले नाही. अ‍ॅप्रूव्हल पाठवले आहे, ते आल्यावर सर्व वेतन मिळेल असे त्यास सांगण्यात आले. यामुळे त्यावर उपासमीरीची वेळ आली. घरखर्च कसा चालवायचा या चिंतेमुळे त्यांना १५ दिवसांपूर्वी मेंदूत रक्तस्राव झाला. त्यात पक्षाघात झाला. त्यांना औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, उपचार सुरू असताना त्यांचा बुधवारी दुपारी मृत्यू झाला. उपचारावर ४ लाख रुपये खर्च आला होता.मृतदेह पाच तास शाळेतशिक्षकाचा मृत्यू झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी मृतदेह पानवडोद येथील शाळेत आणला. सकाळी ८ वाजेपासून ते दुपारी १ वाजेपर्यंत मृतदेह शाळेत ठेवण्यात आला होता. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. यामुळे पानवडोद गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता.अखेर गुन्हा दाखलसकाळी ९ वाजेपासून सुरू असलेला वाद अखेर दुपारी २ वाजता मिटला. संस्थाचालकाने उपचारावर झालेला खर्च व मुलींच्या शिक्षणासाठी दोन लाखांचा धनादेश दिल्याने व अ‍ॅप्रूव्हलप्रमाणे वेतन निघाले, तर थकबाकी देण्यास संस्थाचालक बांधील राहील असे आश्वासन दिले, त्यानंतर अजिंठा पोलिसांनी संस्थाचालक सुभाष गंगाराम मानकर यांच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा भा.दं.वि. ३०६ नुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह शाळेसमोरून हटविला व जळकीबाजार येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.तणाव व पोलीस बंदोबस्तया घटनेमुळे पानवडोद गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता. काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून अजिंठा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शंकर शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी राम मांडुरके, फौजदार अनंत जगताप, सिल्लोड ग्रामीणचे सपोनि मिलिंद खोपडे, कर्मचारी अजित शेकडे, रमेश जगदाळे, सुभाष नवसारे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या वेळी नायब तहसीलदार पवार, शिक्षण विभागाचे अधिकारी हजर होते. (वार्ताहर)४सदर शाळेस २००१ ला मान्यता मिळाली. ८ वी ते दहावीपर्यंत ही शाळा आहे. पहिली ते सातवीला अनुदान नाही; पण ८वी ते १०वीला २००८ मध्ये १०० टक्के अनुदान मिळाले होते. मयत शिक्षक ८वी ते १०वीला माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करीत होता, म्हणजे शाळेला १०० टक्के अनुदान असताना संस्थाचालकांच्या आठमुठ्या धोरणामुळे व तांत्रिक त्रुट्या ठेवल्यामुळे या शिक्षकाचे अ‍ॅप्रूव्हल निघाले नाही.४सदर मयत शिक्षकाने नोकरी लावण्यासाठी संस्थाचालकास अर्धा एकर असलेली शेती विकून ३ लाख ५० हजार रुपये दिले होते, त्यामुळे आता त्यांच्या कुटुंबाकडे शेतीही राहिली नाही व उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.या शाळेत माध्यमिक शाळेला १०० टक्के अनुदान असताना अनुदानित शाळेत आणखी पाच शिक्षकांना पगार नाही. यामुळे पाच शिक्षकांपैकी बापूराव शंकरराव चव्हाण (शिक्षक) व अरुण रामराव दौड (शिपाई) या कर्मचाऱ्यांनी दोन वर्षांपूर्वी संस्थाचालकाविरुद्ध औरंगाबाद येथील न्यायालयात दावा दाखल केलेला आहे. दावा दाखल केल्यामुळे या दोन कर्मचाऱ्यांना संस्थाचालकाने दोन वर्षांपूर्वी कामावरून कमी केले आहे. ते दोन्ही कर्मचारी न्यायालयाच्या निर्णयाकडे नजर ठेवून आहेत, अशी माहिती शिक्षक बापूराव चव्हाण यांनी दिली.