कारच्या धडकेत गंभीर जखमी पती -पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 13:27 IST2019-03-15T13:26:45+5:302019-03-15T13:27:10+5:30
वेरूळ येथील आखातवाडा फाटा येथील घटना

कारच्या धडकेत गंभीर जखमी पती -पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू
खुलताबाद: दुचाकीस्वारास कारने मागील बाजूने जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या पती- पत्नीचा शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात गुरूवारी सांयकाळी सहा वाजेच्या सुमारास सोलापूर- धुळे मार्गावरील वेरूळ नजीक आखात वाडाफाटा येथे घडला.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, खुलताबाद तालुक्यातील सुलतानपूर येथील भागीनाथ दगडू आधाने ( 50 ) व त्यांची पत्नी कासाबाई ( 42) हे मोटारसायकलवर (एम.एच. 20 डी.एस. 5949 ) चिंचोली येथे कामानिमित्त गेले होते. सायंकाळी सुलतानपूरला येत परतत होते. यावेळी कन्नडहून औरंगाबादकडे येत असलेल्या एका कारने (एम.एच.20 ई.वाय. 7161) त्यांच्या दुचाकीस पाठीमागून जोरदार धडक दिली. यात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी औरंगाबाद घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आले. भागीनाथ यांचा उपचारादरम्यान गुरूवारी रात्री उशिरा मृत्यू झाला तर कासाबाई भागीनाथ आधाने यांचा आज सकाळी 11 वाजेच्या दरम्यान मृत्यू झाला.
याप्रकरणी रंगनाथ पंढरीनाथ चव्हाण यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून कारचालका विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास फौजदार झरेकर हे करीत आहेत. पती- पत्नीच्या अपघाती मृत्यूमुळे गावावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई व दोन मुले आहेत.