पत्नीच्या हत्येनंतर मुलगा व सुनेच्या मदतीने मृतदेहाची लावली विल्हेवाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 13:34 IST2019-05-29T13:31:09+5:302019-05-29T13:34:00+5:30

पतीने क्षुल्लक कारांवरून पतीस बेदम मारहाण केली यातच त्यांचा मृत्यू झाला 

dead body destroys with the help of son and daughter-in-law, after the murder of his wife | पत्नीच्या हत्येनंतर मुलगा व सुनेच्या मदतीने मृतदेहाची लावली विल्हेवाट

पत्नीच्या हत्येनंतर मुलगा व सुनेच्या मदतीने मृतदेहाची लावली विल्हेवाट

ठळक मुद्देपतीसह मुलगा, सुनेविरुद्ध खुनाचा गुन्हा कन्नड तालुक्यातील गणेशपूर येथील घटना

पिशोर (जि. औरंगाबाद) : आजारपणाच्या कारणावरून पत्नीला जबर मारहाण केल्याने तिचा मृत्यू झाला. समाजापासून घटना लपविण्यासाठी पतीने मुलगा व सुनेच्या मदतीने मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावल्याची घटना कन्नड कन्नड तालुक्यातील गणेशपूर येथे घडली. याप्रकरणी मयत महिलेच्या भावाच्या फिर्यादीवरून पिशोर पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा  पतीसह मुलगा व सुनेविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

कमलाबाई भावसिंग महेर (६०), असे मयत महिलेचे नाव आहे, तर गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये मयत विवाहितेचा पती भावसिंग दौलत महेर, मुलगा रायसिंग भावसिंग महेर, सून संगीता रायसिंग महेर या तिघांचा समावेश असून, पतीसह मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. गणेशपूर येथील कमलाबाई  यांचे पतीशी शुक्रवारी  जोरदार भांडण झाले. पतीने तिला बेदम मारहाण केली. त्यातच तिचा मृत्यू झाला. समाजात आपली बदनामी होईल, या भीतीने मुलगा रायसिंग व सून संगीता हिला विश्वासात घेऊन मृतदेह बैलगाडीत नेऊन शेतात परस्पर जाळून विल्हेवाट लावण्यात आली.

दरम्यान, भावसिंग महेर याने बोरगाववाडी येथील आपला चुलत साला सुभाष कचरू चुंगडे याला सोमवारी (दि.२७) रात्री फोन करून कमलाबाई २४ तारखेच्या दुपारपासून बेपत्ता असल्याचे सांगितले. यानंतर सुभाष यांनी मंगळवारी सकाळी ही बाब मयत कमलाबाई यांचा सख्खा भाऊ मंगलसिंग भावलाल चुंगडे यांना सांगितली. यानंतर मंगळवारी मंगलसिंग, सुभाष व पुतण्या सचिनसोबत गणेशपूर गाठून बहीण कमलाबाई कुठे आहे. याबाबत  त्यांना संशय आला. त्यात गावातील एकाने झालेल्या खुनाची गुप्त माहिती दिली.   पोलिसांनी  शहानिशा केली असता  प्रेत जाळल्याचे निदर्शनास आले, म्हणून परस्पर प्रेताची विल्हेवाट लावल्याप्रकरणी पोलिसांनी  वरीलप्रमाणे कारवाई केली.

Web Title: dead body destroys with the help of son and daughter-in-law, after the murder of his wife