शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

मनपाच्या कागदी घोड्यावर डेंग्यूचा डास स्वार

By admin | Updated: August 22, 2014 00:20 IST

औरंगाबाद : शहरात साथरोगांची लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे.

औरंगाबाद : शहरात साथरोगांची लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. वातावरणातील उकाड्यामुळे कूलर अजूनही सुरू आहेत. तसेच घरालगतची डबकी व साठवलेल्या स्वच्छ पाण्यातील डासांची पैदास वाढल्यामुळे तापाचे रुग्ण दवाखान्यांत दिसून येत आहेत. फॉगिंग व औषधी फवारणी वॉर्डांमध्ये होत नसल्याचा आरोप नागरिकांनी सुरू केल्यामुळे साथरोगांचे नियंत्रण कागदावरच असल्याचे दिसते आहे. मनपा आरोग्य विभागाने अ‍ॅबेट वाटप मोठ्या प्रमाणात केले आहे. मात्र, फॉगिंग कोणत्याही वॉर्डात केलेले नाही. जेथे मागणी तेथे फॉगिंग, असे काम सुरू असल्यामुळे पालिकेने औषधी फवारणी आणि धूरफवारणीसाठी कोणतेही वेळापत्रक तयार केलेले नाही. कामगार कॉलनी, विठ्ठलनगरच्या नगरसेविका सविता घडामोडे व त्यांच्या मुलाला काल डेंग्यूसदृश ताप आल्याने धूत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. डेंग्यूने आजवर ९ बळी घेतले आहेत. मनपा दप्तरी चार महिन्यांत १२० डेंग्यूसदृश रुग्णांची नोंद झाली असली तरी तापेचे हजारो रुग्ण आहेत. साथरोग वाढण्यासाठी मनपाचा घनकचरा व्यवस्थापन, नालेसफाई करणारा विभाग, दूषित पाणीपुरवठा करणारी यंत्रणा जबाबदार आहे.