शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

अपहारप्रकरणी घोटाळेबाजांना दणका

By admin | Updated: March 26, 2015 00:57 IST

बीड : केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील राष्ट्रीय पेयजल अंर्तगत झालेल्या अर्धवट कामासाठी जुने साहित्य वापरुन ४२ लाख रुपये खर्च केल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले होते

बीड : केज तालुक्यातील दहिफळ वडमाऊली येथील राष्ट्रीय पेयजल अंर्तगत झालेल्या अर्धवट कामासाठी जुने साहित्य वापरुन ४२ लाख रुपये खर्च केल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले होते. या प्रकरणी कसुन चौकशी लागली असून या प्रकरणी एक ग्रामरोजगार सेवक बडतर्फ करण्यात आला आहे. तसेच ग्रामरोजगार सेवकास निलंबीत केले आहे तर तांत्रिक अधिकाऱ्यावर आपल्यास्तरावरुन करण्याच्या सुचना जि.प. सीईओने दिल्या आहेत. मजुरांना पैसे वाटप करणाऱ्या पोस्ट मास्तरवर आपल्या स्तरावर कारवाई करण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. केज तालुक्यातील पेयजल कार्यक्रम योजनेला २०११ मध्ये मंजुरी मिळाली होती. पाणी पुरवठा व स्वच्छता समितीने आता पर्यंत ४२ लाख ९४ हजार २५६ रुपयांची एमबी रेकॉर्ड केली होती. या योजनेर्तंगत गावामध्ये पाणी पुरवठ्यासाठी उद्भव विहिर, पाईप लाईन व इत्यादी कामे केले असल्याचे २०१३-१४ या वर्षात झालेल्या कामाची एमबी दहिफळ वडमाऊली गावच्या समितीने जि.प. पाणी पुरवठा समितीला सादर केला होता. सदरील योजनेच्या कामात जुने साहित्य वापरुन पैशाचा गैरव्यवहार केला असल्याचा आरोप दत्तात्रय येडू व ग्रामस्थांनी करत मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे केला होता. या प्रकरणी कसुन चौकशी सुरु आहे. सदरील कामात पंचायत समितीचे तांत्रिक अधिकारी रोटे हे दोषी अढळुन आले आहेत. त्यांच्यावर आपल्या स्तरावरुन कारवाई करण्याच्या सूचना जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी ननावरे यांनी जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांना दिल्या आहेत. (प्रतिनिधी)