लग्नाच्या वरातीत नाचण्यावरून महिलेस मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 18:27 IST2019-01-18T18:27:18+5:302019-01-18T18:27:33+5:30

लग्नाच्या वरातीत नाचू देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून आठ ते दहा जणांनी लाठ्याकाठ्याने मारहाण करून महिलेची छेड काढली.

 Dancing women in dance | लग्नाच्या वरातीत नाचण्यावरून महिलेस मारहाण

लग्नाच्या वरातीत नाचण्यावरून महिलेस मारहाण

औरंगाबाद : लग्नाच्या वरातीत नाचू देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून आठ ते दहा जणांनी लाठ्याकाठ्याने मारहाण करून महिलेची छेड काढली. ही घटना १६ जानेवारी रोजी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास हर्सूल येथे घडली. याप्रकरणी हर्सूल ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

शेख जुनेद, शेख अरबाज शेख रियाज, शेख आवजे शेख युनूस, शेख रियाज शेख गयाज (रा. यासीननगर), शेख फैजान आणि अन्य आठ ते दहा अनोळखींचा आरोपींमध्ये समावेश आहे. याविषयी हर्सूल पोलिसांनी सांगितले की, तक्रारदारांच्या मुलीच्या लग्नानिमित्त १६ जानेवारी रोजी रात्री हर्सूल परिसरात स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त काढण्यात आलेल्या वरातीत आरोपी नाचण्यासाठी आले. त्यावेळी तक्रारदार महिलेने त्यांना नाचण्यास मनाई केल्याने त्यांच्यात वाद झाला. त्यांनी महिलेसह त्यांच्या नातेवाईकांनाही मारहाण केली. यावेळी आरोपींनी शामियान्याची तोडफोड करून जिवे मारण्याची धमकी दिली.
 

 

Web Title:  Dancing women in dance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.