शहरं
Join us  
Trending Stories
1
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
2
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
3
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
4
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
5
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
6
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
7
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
8
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
9
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
10
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
11
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
12
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
13
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
14
‘न्याय द्या, तरच भेटीला या’, हा ‘हॅशटॅग’ बनला तर?
15
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
16
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
17
IPL 2026 : हिटमॅन रोहितचा धमाका! MI चा विक्रमी विजय; पंतच्या LSG ला पराभवाचा मोठा धक्का
18
नसरापूर ग्रामस्थांनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली; ‘त्या’ मागणीवर उपमुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
19
३३ व्या वर्षी IPL पदार्पण! पहिल्या विकेटनंतर संपला १५ वर्षांचा संघर्ष; रघुचं ‘नोट सेलिब्रेशन’ चर्चेत
20
वानखेडेवर रोहित-रिकल्टनचा मोठा धमाका! LSG च्या गोलंदाजांची धुलाई करताना 'या' विक्रमाला घातली गवसणी
Daily Top 2Weekly Top 5

४ लाखांवर डल्ला

By admin | Updated: June 1, 2014 00:25 IST

चाकूर : तालुक्यातील घरणी शिवारातील एका शेतकर्‍याच्या घरात दिवसाढवळ्या धाडसी चोरीची घटना शुक्रवारी घडली आहे़

चाकूर : तालुक्यातील घरणी शिवारातील एका शेतकर्‍याच्या घरात दिवसाढवळ्या धाडसी चोरीची घटना शुक्रवारी घडली आहे़ या घटनेत रोख व सोने, चांदीचे दागिने असा ४ लाखांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे़ याप्रकरणी शनिवारी चाकूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ घरणी शिवारातील अभंगे यांच्या शेतात उत्तमराव राजाराम रकटाटे हे शेती कसून पत्नी, दोन मुले व सुनेसह तेथेच वास्तव्यास असतात़ दरम्यान, त्यांनी अंबुलगा शिवारात आपल्या घराचे बांधकाम सुरु केले आहे़ या बांधकामासाठी रकटाटे यांनी घरणी येथील घरात २ लाख रुपये रोख आणून ठेवले होते़ तसेच कुटुंबियांचे नेकलेस, झुमके, अंगठ्या, सरपाळे असे २ लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे-दागिनेही ठेवण्यात आले होते़ दरम्यान, शुक्रवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घरातील सर्वच जण कामानिमित्त घराबाहेर पडले होते़ ही संधी साधून चोरट्यांनी रकटाटे यांच्या घरात धाडसी चोरी करीत रोख व दागिने असा ४ लाख रुपयांचा ऐवज पळवून नेला आहे़ याप्रकरणी उत्तमराव रकटाटे यांनी शनिवारी चाकूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. (वार्ताहर) लातुरातही चोरी लातुरातील अष्टविनायक मंदिराजवळ राहणार्‍या विपुल रोईसर हे मेहुण्याचा अपघात झाल्याने घरास कुलूप लावून पुण्याला गेले होते़ दरम्यान, चोरट्यांनी कुलूप तोडून या घरातील ७ हजार रुपये पळूवन नेले आहेत़