छत्रपती संभाजीनगरात दररोज २५० टन गहू, ४०० टन मैदा, आट्याची विक्री 

By प्रशांत तेलवाडकर | Published: December 10, 2023 11:31 AM2023-12-10T11:31:08+5:302023-12-10T11:35:02+5:30

शहरात सध्या मध्य प्रदेश, राजस्थान व गुजरात राज्यातून गव्हाची आवक होत आहे.

Daily sales of 250 tons of wheat, 400 tons of Maida, flour in Chhatrapati Sambhajinagar | छत्रपती संभाजीनगरात दररोज २५० टन गहू, ४०० टन मैदा, आट्याची विक्री 

छत्रपती संभाजीनगरात दररोज २५० टन गहू, ४०० टन मैदा, आट्याची विक्री 

छत्रपती संभाजीनगर : भाकरी खाणाऱ्यांचे प्रमाण वाढले असले तरी पोळीशिवाय जेवणात मजा नाही, असेच बहुतांश नागरिक सांगतात. त्यामुळेच शहरात दररोज २५० टन गहू तर २०० टन मैदा व २०० टन आटा, तंदूर आट्याची विक्री होते. आट्याची विक्री नुसतीच पोळ्यांसाठी नव्हे तर बेकरी उत्पादनातही मोठ्या प्रमाणात मैदा लागत आहे, त्यामुळे विक्री वाढली आहे.

मध्य प्रदेश, राजस्थान, गुजराती गव्हावर मदार
शहरात सध्या मध्य प्रदेश, राजस्थान व गुजरात राज्यातून गव्हाची आवक होत आहे. मध्यंतरी गव्हाला कीड लागल्याने गव्हाची गुणवत्ता खराब झाली होती. सध्या दर्जेदार गव्हाची कमतरता बाजारात जाणवत आहे. त्यामुळे गव्हाच्या भावात मागील १० महिन्यांत १ हजार रुपये वाढले असून, ३३०० ते ३७०० रुपये क्विंटल गहू विकला जात आहे.

हायब्रीडने शाळू ज्वारीची भाववाढ रोखली
शाळू ज्वारीत १० महिन्यांत तब्बल अडीच हजार रुपये भाववाढ झाली. सध्या शाळू ज्वारी ५५०० ते ६१०० रुपये क्विंटल विकत आहे. खान्देशातून हायब्रीड ज्वारीची आवक सुरू झाली असून ३८०० ते ४२०० रुपये क्विंटल विकत आहे. या हायब्रीड ज्वारीने शाळू ज्वारीची भाववाढ रोखली आहे.

थंडी जाणवताच बाजरीचा खप वाढला १२ टनांपर्यंत
दीड महिन्यांपूर्वीच बाजरीची आवक सुरू झाली तेव्हा २४०० ते २७०० रुपये क्विंटलने बाजरी विकत होती. मात्र, अवकाळी पावसाने बाजरीचा रंग काळवंडला आहे. त्यामुळे चांगल्या बाजरीचा २९०० ते ३२०० रुपये क्विंटल भाव आहे. त्यात आता कर्नाटक व राजस्थानमधून बाजरी येत असून २८०० ते ३१०० रुपयांपर्यंत विकत आहे. दररोज १२ टन बाजरीचा खप शहरात होत आहे.
- नीलेश सोमाणी, होलसेल व्यापारी

निर्यातीने रवा, मैदा, आटाही महागला
गव्हापाठोपाठ रवा, मैदा, आट्याची मोठ्या प्रमाणात निर्यात झाली. त्यामुळे मागील १० महिन्यांत ५० किलोमागे ७० ते ८० रुपयांनी भाववाढ झाली. मैदा बेकरी उत्पादनासाठी लागतो तसेच हॉटेलवाल्यांना आटा व तंदूर आटा लागतो. सध्या मैदा व आटा मिळून दररोजचा खप ४०० टनापर्यंत आहे.
- चांदमल सुराणा, होलसेल व्यापारी

दररोजची विक्री
१) गहू --- २००- २५० टन 
२) ज्वारी-- ७- ८ टन 
३)बाजरी--१०-१२ टन
४) रवा-- ७५-८० टन
५) मैदा- २०० टन 
६) आटा- २०० टन

कशी झाली भाववाढ?
प्रकार मार्च (प्रतिक्विंटल) डिसेंबर
१) गहू २४०० ते २७००रु-- ३३०० ते ३७००रु
२) ज्वारी ३००० ते ३२०० रु-- ५५०० ते ६१०० रु
३) बाजरी २४००ते २७००रु---२९०० ते ३२०० रु (प्रति ५० किलो)
४) रवा १५५५ ते १५७० रु ---१६२५ ते १६५० रु 
५) मैदा १५३० ते १५५०रु ---१६०० ते १६७० रु 
६) आटा १४५५ ते १४८० रु ---१५२५ ते १५६० रु 
७) तंदूर आटा १५३० ते १५८०रु --१६०० ते १६६० रु

Web Title: Daily sales of 250 tons of wheat, 400 tons of Maida, flour in Chhatrapati Sambhajinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.