शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

दारूसाठी गुन्हेगारांचा बारमध्ये राडा; १४ हजारांचे बिल बुडवले, तलवारीच्या धाकावर ५ हजार लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 14:20 IST

जामिनावर सुटलेल्या खुनी आरोपीचा हॉटेलमध्ये धुमाकूळ; तलवार उगारत दहशत, कर्मचाऱ्यांना मारहाण

छत्रपती संभाजीनगर : फुकट दारूच्या हव्यासातून चार गुन्हेगारांनी बारमध्ये राडा घातला. कर्मचाऱ्यांना मारहाण करून तलवार उपसून अन्य ग्राहकांना धमकावत १४ हजार ३३३ रुपयांचे बिल बुडवून व्यवस्थापकाच्या खिशातून ५ हजार रुपये काढून घेत खुनाची धमकी दिली. २१ मार्च रोजी रात्री १ वाजता लिंक रोडवरील काबरू हाऊस हॉटेलमध्ये ही घटना घडली. विकास रहाटवाडे व सारंग तरमगे (रा. कांचनवाडी) असे त्यांचे नाव असून त्यांच्यासह त्यांचे दोन अन्य साथीदार घटनेनंतर पसार झाले आहेत.

आकाश कांतीलाल गोलेच्छा (२९, रा. राजाबाजार) हे सदर बारमध्ये व्यवस्थापक आहेत. २१ मार्च रोजी ते कर्तव्यावर हजर असताना आरोपी विकास, सारंग व अन्य दोघे त्यांच्या बारमध्ये गेले. दारूची ऑर्डर दिल्यानंतर त्यांनी अचानक अमराठी कर्मचाऱ्यांवरून वाद घातला. कंबरेला लावलेली तलवार काढून बारमध्ये फिरवत आरडाओरड केली. आकाश यांना मारहाण करून त्यांच्या खिशातील ५ हजार रुपये रक्कम हिसकावून घेतली. अन्य ग्राहकांना धमकावत कर्मचारी, व्यवस्थापकांना नाहक माफी मागण्यास लावून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.

१४ हजारांची दारू घेऊन पसारआरोपी विकास, सारंग व अन्य दाेघांनी मिळून बारमधून तब्बल १४ हजार ३३३ रुपयांची दारू खरेदी केली. काही वेळ बारमध्ये राडा घालून ती दारू तशीच घेऊन थेट कारमध्ये (एमएच -२०-ईएक्स-१४३१) बसून पसार झाले. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे तपास करत आहेत.

२०२१ मध्ये मित्राची केली होती हत्यातरंगेवर यापूर्वी मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. तर विकास रहाटकर (रा. कांचनवाडी) याने संदीप ऊर्फ गुज्जर मुळेकर याच्यासोबत मिळून १२ सप्टेंबर, २०२१ रोजी त्याचा मित्र महेश काकडे याची डोके ठेचून क्रूर हत्या केली होती. त्या गुन्ह्यात काही महिन्यांपूर्वी तो जामिनावर सुटताच त्याने पुन्हा परिसरात दहशत माजवणे सुरू केले.

English
हिंदी सारांश
Web Title : Criminals Wreak Havoc in Bar for Liquor; Robbery Ensues

Web Summary : Four criminals terrorized a bar for free liquor, assaulting staff, brandishing a sword, and robbing ₹5,000. They fled without paying the ₹14,333 bill. One had a prior murder charge.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर