शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

टोळीला पिस्तूल पुरवून गोळीबाराचा रचला कट, सूत्रधारांच्या शोधात पथक रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 13:50 IST

मुकुंदवाडी गोळीबार : सात हल्लेखोरांना २३ जानेवारीपर्यंत पाेलिस कोठडी; पाेलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी शुभम जाटच्या कुटुंबावर स्वतंत्र गुन्हा

छत्रपती संभाजीनगर : मोबाइल व मुलीच्या वादातून दोन कुख्यात गुन्हेगारांमध्ये झालेल्या गोळीबार हा नियोजनबद्ध कट हाेता. कुख्यात गुन्हेगार शुभम भिकूलाल जाट (३०) याला पिस्तूल पुरवून अजय कागडा याच्या हत्येचे नियोजन आखण्यात आले होते. पुंडलिकनगर पोलिसांनी आता त्याही गुन्हेगारांचा शोध सुरू केला असून संपूर्ण टोळींचा आरोपींमध्ये समावेश करणार असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगिततले.

कुख्यात गुन्हेगार अजय कागडाचे नातेवाईक सचिन लाहोट (रा. मुकुंदवाडी) यांच्या घरावर जाटने टोळीसह सशस्त्र हल्ला चढवला. १९ जानेवारी रोजी सकाळी घडलेल्या या घटनेत जाटने दोन वेळेस गोळीबार केला. या घटनेमुळे मुकुंदवाडी, पुंडलिकनगर परिसरातील संघटित गुन्हेगारी पुन्हा एकदा अधोरेखित झाली. यात अटकेत असलेल्या जाटसह मयूर संजय उनगे, शिवा रमेश भालेराव, गोल्या ऊर्फ विजय दिनकर धनई, मनोज संजय पडूळ, सागर राऊत, अमर ऊर्फ अतुल पवार यांना मंगळवारी पोलिस निरीक्षक अशोक भंडारे यांनी न्यायालयात हजर केले. आरोपींना पिस्तूल कोणी पुरवले, कट आखण्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, गोळीबार करण्यासाठी आरोपींचा आणखी काही उद्देश होता का, याचा तपास करायचा असल्याने सरकारी पक्षाने पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने २३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली.

जाटचे कुटुंबही आता पोलिस रेकॉर्डवरशुभम जाटचा भाऊ महावितरणमध्ये शासकीय कर्मचारी आहे. कुटुंबासह तो आलिशान रो-हाऊसमध्ये राहतो. २०१२ मध्ये गुन्हेगारी जगतात सक्रिय झालेल्या जाटवर १५ पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही महिन्यांपासून तो हैदराबादमध्ये होता. नुकताच शहरात येत त्याने थेट गोळीबार करत पोलिसांना आव्हान दिले. त्याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना त्याच्या कुटुंबाने धक्काबुक्की करून हल्ला केला. शिवाय, शुभमला पळून लावण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी त्याच्या साथीदारांसह भाऊ कैलास भिकूलाल जाट, बहीण पूनम भिकूलाल जाट, आई सुखना, पत्नी नेहा यांच्यावरही सातारा पाेलिस ठाण्यात स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यात आल्याने आता कुटुंबही पाेलिसांच्या रेकॉर्डवर आले आहे.

मोक्काची तयारी, शुभमच्या संपर्कातील प्रत्येकावर कारवाईगोळीबाराच्या घटनेची पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी गंभीर दखल घेतली. शुभम, अटकेतील साथीदारांव्यतिरिक्त त्याच्या संपर्कात असलेले गुन्हेगार, मित्रांवरही आता पोलिस कठोर कारवाईची तयारी करत आहेत. सोशल मीडियावर शुभमची टोळी सातत्याने आक्षेपार्ह पोस्ट करत असते. सायबर पोलिसांकडून मात्र त्यावर कुठलीच कारवाई केली जात नाही, हे विशेष. सोमवारच्या घटनेमुळे मात्र पोलिसांनी आता या सर्वच टोळीचा बंदोबस्त करण्यासाठी मोक्काच्या कारवाईसाठी तयारी सुरू केल्याचे सूत्रांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Gang Supplied Pistol, Planned Shooting; Team Deployed to Find Masterminds

Web Summary : A planned shooting, stemming from a dispute over a girl and mobile, targeted Ajay Kagada. Police are investigating who supplied the pistol to Shubham Jat and others involved in the conspiracy. The Jat family is also under scrutiny for obstructing police.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर