शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कोटींची इमारत बेकायदेशीरच

By admin | Updated: May 26, 2015 00:49 IST

अंबाजोगाई : शहरातील शिवाजी चौकालगत कोट्यवधी रूपये खर्चून टोलेजंग इमारत उभारत गाळ्यांची विक्री केली होती. ही इमारत महसूल प्रशासनाच्या जागेत असून

अंबाजोगाई : शहरातील शिवाजी चौकालगत कोट्यवधी रूपये खर्चून टोलेजंग इमारत उभारत गाळ्यांची विक्री केली होती. ही इमारत महसूल प्रशासनाच्या जागेत असून तिचे बांधकाम नियमबाह्य असल्याचा निर्वाळा सोमवारी उपविभागीय अधिकारी प्रशांत सूर्यवंशी यांनी दिला आहे. बांधकाम पाडून फौजदारी दाखल का करण्यात येऊ नये ? अशी नोटीस सूर्यवंशी यांनी बांधकाम करणाऱ्यांना दिली आहे.सर्व्हे क्रमांक ६१२ ब ही १८ आर जागा शासनाच्या मालकीची असून सातबारावर सरकार कस्टोडीयन अशी नोंद असल्याचे सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. ही जमीन शामसुंदर रामकिशनजी पुनपाळे (रा. रेणापूर, जि. लातूर), नंदकिशोर रघुनाथजी करवा (रा. लातूर), शेख शफी शेख चाँद (रा. बाराभाई गल्ली) यांनी या जागेवर बांधकाम केले. हे बांधकाम करतांना जागेचे मूळ अधिकार अभिलेख तसेच अकृषि व कोणतेही सबळ पुरावे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे मागणी करूनही सादर केले नाहीत. या ठिकाणी दुकान, गाळे व इतर बांधकामे करण्यात आली आहेत. तसेच सदर जमीन ही सर्व्हे ६१२ ब ची असून त्यावर सरकारी कस्टोडीयन अशी नोंद असून त्याबाबत कोणतेही अभिलेख नगरपरिषदेकडे दिले नाहीत. नगर परिषदेकडे केलेल्या नोंदी या वस्तूस्थिती लपवून केलेल्या आहेत, असा ठपका ठेवण्यात आला.नगर परिषदेकडे मालमत्ता कराच्या नोंदी या मालमत्ता कर वसुलीसाठी असतात. त्या मालकी हक्काच्या नोंदी नाहीत त्यामुळे हा प्रकार दिशाभूल करणारा आहे. बेकादेशीररित्या सरकारी जमीनीवर बांधकाम परवानगी घेऊन बांधकाम करून ते वापरात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ५० प्रमाणे अतिक्रमण काढण्याची कारवाई का करण्यात येऊ नये? तसेच बेकायदेशीर कृत्याबाबत फौजदारी कारवाई का करण्यात येऊ नये? अशी नोटीस संबंधित अतिक्रमणधारकांना बजावली आहे. (वार्ताहर)मध्यवर्ती ठिकाणी राजधानी प्लाझा नावाची टोलेजंग इमारत बांधण्यात आली. या इमारतीतील गाळे लाखो रुपये किंमतीला विकण्यात आले. शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी या ठिकाणचे गाळे खरेदी करून कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. ही जागा शासनाच्या मालकीची असल्याचा निर्वाळा प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्याने व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.राजधानी प्लाझाचे बांधकाम बेकायदेशीर व अवैध असून या संदर्भात प्रशासकीय पातळीवर कारवाई सुरू आहे. या बांधकामाबाबत अतिक्रमणे काढून फौजदारी कारवाई करण्याबाबत संबंधितांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. २६ मे पर्यंत या संदर्भात कागदपत्रंची पूर्तता न झाल्यास ठोस कारवाई करणार असल्याचे उपविभागीय अधिकारी प्रशांत सुर्यवंशी लोकमतशी बोलतांना म्हणाले.