अनधिकृत बांधकाम करणार्यांवर गुन्हे
By Admin | Updated: May 28, 2014 00:38 IST2014-05-28T00:33:41+5:302014-05-28T00:38:08+5:30
परभणी : शहरात अनधिकृत बांधकाम करणार्या तीन जणांविरूद्ध मनपा स्वच्छता विभागाच्या वतीने नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़

अनधिकृत बांधकाम करणार्यांवर गुन्हे
परभणी : शहरात अनधिकृत बांधकाम करणार्या तीन जणांविरूद्ध मनपा स्वच्छता विभागाच्या वतीने नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ शहरात अनधिकृत बांधकाम केलेल्या कविता राजेश पवार (प्रभावतीनगर), रेखा मधुसूदन लाहोटी व मधुसूदन रामकिशन लाहोटी (सहकारनगर), दत्ता रामभाऊ सुके यांनी अनधिकृत बांधकाम केल्याबद्दल स्वच्छता निरीक्षक अशोक स्वामी यांच्या फिर्यादीवरून नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत़ ही कारवाई २६ मे रोजी करण्यात आली़ यामुळे परभणी शहरातील अनधिकृत बांधकाम करणार्या नागरिकांचे धाबे दणाणले आहेत़ शहरामध्ये अनेकांनी बेकायदेशीररित्या बांधकाम केले आहे़ अशा विरूद्धही संबधित विभाग कारवाई करील का असा सवाल सर्वसामान्य नागरिकांतनू केला जात आहे़ (प्रतिनिधी)शहरातील नागरिकांनी अनधिकृत बांधकाम करू नये, असे आवाहन महानगरपालिकेचे उपायुक्त दीपक पुजारी यांनी केले आहे़ शहरातील अनधिकृत बांधकाम करणार्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश स्वच्छता निरीक्षकांना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. परभणी शहरामध्ये अनधिकृत घराचे बांधकाम करणार्यांवर मनपाने गुन्हे दाखल केल्यामुळे नागरिकांचे धाबे दणाणले आहेत़ परभणी शहरातील रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे थाटण्यात आली आहेत़ अशांवर महानगरपालिका कुठल्याही प्रकारची कारवाई करीत नाही़ परंतु अनधिकृतरित्या घराचे बांधकाम करणार्यांविरूद्ध गुन्हे दाखल करण्याची मोहीम हाती घेतल्याने नागरिकांतून नाराजीचा सूर उमटत आहे़