छ. संभाजीनगरजवळ माजी नगरसेवकाच्या हॉटेलमधील जुगार अड्ड्यावर छापा, २४ जुगारी ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 18:25 IST2025-08-30T18:20:58+5:302025-08-30T18:25:55+5:30
पोलिस अधीक्षकांच्या पथकाच्या कारवाईत १२ लाखांचा ऐवज जप्त

छ. संभाजीनगरजवळ माजी नगरसेवकाच्या हॉटेलमधील जुगार अड्ड्यावर छापा, २४ जुगारी ताब्यात
फुलंब्री : सावंगी (हर्सूल) परिसरात जळगाव रोडवरील एका माजी नगरसेवकाच्या हॉटेलमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या पथकाने शुक्रवारी (दि.२९) रात्री ०७:३० वाजेच्या सुमारस छापा मारला. यात २४ जणांना जुगार खेळताना पकडले. त्यांच्या ताब्यातून १२ लाख ६३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, याप्रकरणी फुलंब्री ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सावंगी परिसरातील पूनम हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे पत्त्याचा क्लब सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस अधीक्षकांच्या पथकासह फुलंबी ठाण्याच्या पथकाने हॉटेलच्या मागील बाजूस सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शुक्रवारी रात्री धाड टाकली. यावेळी अनेक जुगारी पत्त्यांचा खेळ खेळताना आढळले. यावेळी त्यांच्या ताब्यातून १ लाख ६८ हजार रुपये रोख, एक चारचाकी, सहा दुचाकी, मोबाइल, तसेच जुगाराचे साहित्य, असा ऐवज हस्तगत करण्यात आला. २४ जुगाऱ्यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईनंतर परिसरातील अन्य अवैध धंद्यांवरही पोलिसांची नजर राहणार असल्याचे संकेत मिळत आहेत. या कारवाईत पोलिस निरीक्षक संजय सहाणे, सपोनि सिद्धेश्वर गोरे, सपोनि रघुवीर मुराडे यांच्यासह पथकात जमादार किशोर राजपूत, शेख शेरू, रामसिंग सुलाने, ईश्वर जारवाल, कैलास राठोड, अनिल शिंदे, इलियास शेख, पांढरे, तामखने, शेजूळ, करताडे, जोनवाल आदींचा सहभाग होता. सर्व जुगाऱ्यांना फुलंब्री ठाण्यात आणले असून, पुढील करवाई सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अशी आहेत आरोपींची नावे :
गुलशेर खान (सावंगी हर्सूल), सय्यद नावीद अली (रोशन गेट), संदीप प्रकाश हिवराळे (जुबिली पार्क), महिंद्रा चंद्रशेखर जैन (शहागंज), सलीम पठाण गुलाम अहेमद (मिटमिटा), विशाल कृष्णा जाधव (मयूर पार्क), विजय भगवान सुपेकर, चंदन शांतीलाल पडगे, योगेश रामकिसन पिठोरे, अभिमन्यू सांडूलाल पहाडिया (चेलीपुरा), सदानंद चापलोत, दिगंबर रामराव गाडेकर, राजू प्रकाश बटावडे (जाधववाडी), शेख गुलाम शेख हमीद (खोकडपुरा), आकाश मगरे, शिवाजी रामभाऊ चालगे (हडको कॉर्नर), शेख भिकन शेख रहीम (रहेमानिया कॉलनी), सोमनाथ साहेबराव श्रीरंग (मिल कॉर्नर), संदीप काशीनाथ बोराडे (चिकलठाणा), रियाज मुसा शेख (बीड बायपास), समीर रहीम शेख (आझाद चौक), राजेश किशन विशिष्ट (बेगमपुरा), नवीन श्यामलाल बशरकर (आलमगीर कॉलनी), शेख राजमोहंमद जमीर शेख (चितेगाव), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.