बिल्डरला मारहाण करीत लुटले, कामावरुन काढल्याचा राग

By राम शिनगारे | Updated: September 18, 2022 18:20 IST2022-09-18T18:19:30+5:302022-09-18T18:20:50+5:30

कैलास नानासाहेब पवार हे बांधकाम व्यवसायिक आहेत. त्यांच्याकडे अरुण वाघमारे हा कामाला होता.

Crime News The builder was beaten and robbed in Aurangabad | बिल्डरला मारहाण करीत लुटले, कामावरुन काढल्याचा राग

बिल्डरला मारहाण करीत लुटले, कामावरुन काढल्याचा राग

औरंगाबाद - कामावरुन कमी केल्याच्या रागातून बांधकाम व्यवसायिकाला कामगाराने रस्त्यात आडवून बेदम मारहाण केली. त्याचवेळी बिल्डरच्या खिशातील १५ हजार रुपये हिसकावून पोबारा केला. या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री गुन्हा नोंदविण्यात आला.

कैलास नानासाहेब पवार (५६, रा.जाधववाडी, सिडको) हे बांधकाम व्यवसायिक आहेत. त्यांच्याकडे अरुण वाघमारे हा कामाला होता. त्यास काही महिन्यांपूर्वी कामावरुन काढून टाकण्यात आले होते. त्याचा राग मनात धरुन वाघमारे याने प्रदीप घनवट (दोघे रा. जोगवाडा) याच्या मदतीने पवार यांना जोगवाडा शिवारातील चिमनपीर येथे शनिवारी सायंकाळी आडवले. त्यांना वाहनातून खाली उतरवित पोटात लाथ मारली. त्याचवेळी घनवट याने त्याच्या हातातील लाकडी दांड्याने मारुन पवार यांना जखमी केले. 

पवार यांच्यासोबत असलेला साहिल भंडारी हा त्यांच्या मदतीसाठी धावला असता त्यासही बेदम मारहाण करण्यात आली. तसेच पवार याच्या पॅन्टच्या खिशातील १५ हजार रुपये बळजबरीने हिसकावून नेत पोबारा केला. या प्रकरणी निरीक्षक शिवाजी तावरे यांनी गुन्हा दाखल करीत उपनिरीक्षक दिलीप बचाटे यांच्याकडे अधिक तपासासाठी सोपवला आहे.
 

Web Title: Crime News The builder was beaten and robbed in Aurangabad