शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

दीड हजार कोटींचा पतपुरवठा आराखडा

By admin | Updated: April 4, 2016 00:23 IST

हिंगोली : जिल्हाभरातील राष्ट्रीयीकृत, खाजगी व सहकारी बँकाकडून २०१६- १७ या वर्षात १ हजार ४६१ कोटी ३८ लाख ८९ हजारांचा पतपुरवठा करण्यात येणार आहे.

हिंगोली : जिल्हाभरातील राष्ट्रीयीकृत, खाजगी व सहकारी बँकाकडून २०१६- १७ या वर्षात १ हजार ४६१ कोटी ३८ लाख ८९ हजारांचा पतपुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १ हजार ३८ कोटी ८९ लाख ७६ हजाराचे पीककर्ज वाटप करण्याचे नियोजन आहे. त्याबाबतचा बँकांच्या वार्षिक पतपुरवठा कृती आराखड्याचे विमोचन जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा अग्रणी बँक अधिकारी महेश मदान, नाबार्डचे डीडीएम एस. एस. गोर्डे, अ‍ॅक्सीस बँकेचे कृषी व्ही. एम. करंदीकर, सुनील कुमार, एम. एल. पाटील, एन. पी. दीक्षित, ए. एन. गटाणी, व्ही. एम. कावरखे, सी. एस. डाके आदी बँकेचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाभरातील बँकांना सन २०१६- १७ च्या वार्षिक पतपुरवठा आराखड्याप्रमाणे नागरिकांना पतपुरवठा वेळेत उपलब्ध करुन द्यावा. तसेच शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी पीककर्जाचे वाटप नियमाप्रमाणे व वेळेत होईल, हे बँकानी काटेकोरपणे पहाण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कासार यांनी दिल्या. मदान यांनी जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत, सहकारी व खाजगी बँकांनी जिल्ह्यात यावर्षी करण्यात येणाऱ्या पतपुरवठ्याची माहिती दिली. यामध्ये वर्षिक पतपुरवठा आराखडा १४६१ कोटीचा असून यातील १ हजार ३८ कोटी खरीप (९६८ कोटी ५० लाख) व रब्बी (७० कोटी ३९ लाख १७) हंगामात शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपासाठी ठेवण्यात आल्याची माहिती दिली. तसेच कृषी पायाभूत सुविधा, शिक्षण, ऊर्जा, सामाजिक क्षेत्रातील पायाभूत सुविधा आदि साठी पतपुरवठा बँकाकडून करण्याचे नियोजन असल्याचे मदान यांनी सांगितले. यावेळी नाबार्डचे गोर्डे यांनी ही सर्व बँकांनी पीककर्ज वाटपामध्ये सुसूत्रता ठेऊन प्रत्येक शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ मिळवून देण्याचे आवाहन केले. (प्रतिनिधी)