शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

शहरात क्रेडाईच्या ‘ड्रीम होम’ प्रदर्शनाला उद्यापासून सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 01:05 IST

क्रेडाईतर्फे २१ सप्टेंबरपासून ‘ड्रीम होम’ प्रदर्शन भरविण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : आपणास घर खरेदी करायचे आहे का, मग जरा थांबा. कारण, बांधकाम व्यावसायिकांची संघटना क्रेडाईतर्फे २१ सप्टेंबरपासून ‘ड्रीम होम’ प्रदर्शन भरविण्यात येत आहे. यात शहरातील नामांकित ६० पेक्षा अधिक बिल्डर्सचे रेरामध्ये नोंदणी झालेल्या गृहप्रकल्पांची एकाच छताखाली माहिती मिळणार आहे. एवढेच नव्हे तर नामांकित कंपन्यांचे बांधकाम साहित्य, अर्थसाहाय्य करणाºया बँका, पंतप्रधान आवास योजना आदींची सविस्तर माहिती येथे उपलब्ध करून देण्यात येत असल्याने गृहइच्छुकांसाठी प्रदर्शन पर्वणीच ठरणार आहे.क्रांतीचौक येथील मॅनोर लॉन्स येथे तब्बल ५० हजार चौरस फुटांवर भव्य प्रदर्शन मंडप उभारण्यात आला आहे. यात लहान-मोठे १०१ स्टॉल उभारले आहेत. २०१३ मध्ये ड्रीम होम प्रदर्शनाला सुरुवात झाली; पण यंदाचे स्वरूप भव्य आहे. यासंदर्भात आयोजित पत्रपरिषदेत क्रेडाईचे अध्यक्ष रवी वट्टमवार यांनी सांगितले की, २१ रोजी सकाळी ११ वाजता प्रदर्शनाचे उद्घाटन मनपाचे आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्या हस्ते होईल. नोटाबंदी, जीएसटी व रेराची अंमलबजावणी यामुळे या क्षेत्रात अस्थिरता निर्माण झाली होती. आता पुन्हा एकदा गृहइच्छुकांचा हक्काचे घर खरेदीकडे ओढा वाढला आहे. दसरा-दिवाळी व गृहइच्छुकांना घर खरेदीत वाव मिळावा, यासाठी प्रदर्शन भरविण्यात येत आहे. एकाच ठिकाणी ६० पेक्षा अधिक बिल्डर्सचे गृहप्रकल्प, आॅफिसेस, दुकाने, निवासी व व्यावसायिक भूखंडाची माहिती मिळणार असल्याने ग्राहकांचा पैसा व वेळ वाचणार आहे. सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील. गृहइच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नरेंद्रसिंग जबिंदा यांनी केले. यावेळी आशुतोष नावंदर, राज्य क्रेडाईचे उपाध्यक्ष प्रमोद खैरनार, माजी अध्यक्ष देवानंद कोटगिरे, पापालाल गोयल, जितेंद्र मुथा, संभाजी अतकरे, विकास चौधरी आदी बिल्डर्स उपस्थित होते.