शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

...सुधरा, अन्यथा तुमचाही ‘सीआर’ खराब करीन

By admin | Updated: December 20, 2015 23:54 IST

औरंगाबाद : राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबविण्यात आम्ही कमी पडलो, तर त्याचा ठपका माझ्या ‘सीआर’वर दिसेल, अशी धमकीच मला शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे.

औरंगाबाद : राज्यात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबविण्यात आम्ही कमी पडलो, तर त्याचा ठपका माझ्या ‘सीआर’वर दिसेल, अशी धमकीच मला शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे. त्यामुळे माझा ‘सीआर’ खराब झाला, तर मी तुमचाही ‘सीआर’ खराब करीन. एकालाही सोडणार नाही, असा इशारा आज शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी शिक्षण संचालकांपासून ते थेट शिक्षकांपर्यंत सर्व यंत्रणेला दिला. शाळबाह्य मुलांच्या पुनर्सर्वेक्षणाबाबत आज रविवारी औरंगाबादेत राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. दुपारी पत्रकारांशी संवाद साधताना शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार म्हणाले की, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम राबवायची जबाबदारी प्रधान सचिवांपासून ते थेट सर्वात शेवटचा घटक असलेल्या शिक्षकांपर्यंत सर्वांची आहे. यासंदर्भात सर्वांना वारंवार सूचना दिल्या आहेत. कार्यशाळांच्या माध्यमातून प्रोग्राम निश्चित केले आहेत. आता अंमलबजावणी करायची आहे. एप्रिल २०१६ ही रिझल्ट दाखविण्याची ‘डेड लाईन’ असेल. प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील मुले मोठ्या प्रमाणात अप्रगत आहेत. या शाळांतील मुले शिकली पाहिजेत. त्यांना लिहायला- वाचायला आले पाहिजे. यासाठी ज्ञानरचनावाद शिक्षण पद्धती अमलात आणली आहे. राज्यातील १८ हजार शाळांमध्ये या शिक्षण पद्धतीमार्फत मुलांना प्रगत करण्याचा आमचा संकल्प आहे. शिक्षण विभागाचे दोन संचालक, आयुक्त यांच्यापासून शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंत शाळा दत्तक देण्यात आलेल्या आहेत. अधिकाऱ्यांनी रिझल्ट दाखवावा. यात आम्ही कमी पडलो, तर सर्वात अगोदर माझा ‘सीआर’ खराब होईल. माझा ‘सीआर’ खराब झाला, तर मी खालच्या सर्वांचा ‘सीआर’ खराब करीन. राज्यात पहिली ते आठवीपर्यंतचा एकही विद्यार्थी अप्रगत राहू नये. एकही मूल शाळाबाह्य राहू नये, हे आमचे ‘टार्गेट’आहे. ४ जुलै रोजी राज्यात एकाच वेळी शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात आले होते. ते बरोबर झालेले नाही, अशी ओरड काही जणांनी केली होती. आता त्यांनाच सोबत घेऊन शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वयंसेवी संस्था व महाविद्यालयीन ‘एनएसएस’चे विद्यार्थ्यांमार्फत पुनर्सर्वेक्षण केले जाणार आहे. शासनाच्या आदेशानुसार लवकरच पुनर्सर्वेक्षणाची तारीख निश्चित केली जाईल. यावेळी शिक्षण आयुक्त पुरुषोत्तम भापकर, उपसचिव सुवर्णा खरात, शिक्षणाधिकारी एम. के. देशमुख आदींची उपस्थिती होती.