CoronaVirus : चिंताजनक ! आता औरंगाबादच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव; रुग्ण संख्या गेली ५३ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 20:47 IST2020-04-26T20:46:18+5:302020-04-26T20:47:14+5:30
दिवसभरात ४ रुग्ण : रुग्णसंख्या ५३ वर

CoronaVirus : चिंताजनक ! आता औरंगाबादच्या ग्रामीण भागातही कोरोनाचा शिरकाव; रुग्ण संख्या गेली ५३ वर
ठळक मुद्देआज एकूण चार रुग्ण दाखल
औरंगाबाद : औरंगाबादेत रविवारी दिवभरात ४ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. धक्कादायक म्हणजे आतापर्यंत औरंगाबाद शहरात मर्यादीत असलेल्या कोरोनाने आता औरंगााबाद ग्रामीण भागातही शिरकाव केला आहे.
दौलताबाद येथील ५३ वर्षीय महिलेला आणि आसिफिया कॉलनी येथील ३९ वर्षीय महिलेचा अहवाल रविवारी रात्री पॉझिटिव्ह आल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या दोन्ही महिलांवर रुग्णांना घाटीत उपचार सुरू आहेत.
शहरातील आसेफिया कॉलनी आणि समतानगर येथे दोन महिलांचा कोरोना अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आला होता. आता शहरातील रुग्णसंख्या ५३ वर गेली.