CoronaVirus : औरंगाबादमध्ये दोन वृद्धांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या ४९ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2020 18:55 IST2020-04-25T17:45:54+5:302020-04-25T18:55:03+5:30
आसिफिया कॉलनी आणि किल्ले अर्क येथील रुग्ण

CoronaVirus : औरंगाबादमध्ये दोन वृद्धांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह; रुग्ण संख्या ४९ वर
ठळक मुद्देघाटीमध्ये सुरू आहेत उपचार
औरंगाबाद : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत जात आहे. शनिवारी सकाळी तीन कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर आता आणखी दोन रुग्णांची भर पडली आहे. यामुळे शहरातील कोरोना बाधितांची संख्या ४९ वर गेली आहे.
औरंगाबादेत शनिवारी सकाळी हिलाल कॉलनी येथील तीन पोजीटिव्ह आढळून आले. तर सायंकाळी आसिफिया कॉलनी, किल्ले अर्क येथील आणखी दोघांचा अहवाल पोजिटिव्ह आला आहे. येथील ६०आणि ७० वर्षीय वृद्धांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून दोन्ही रुग्ण घाटीत दाखल आहेत, अशी माहिती डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी दिली.यामुळे शहरातील रुग्णसंख्या ४९ वर गेली आहे.