Coronavirus : धक्कादायक ! औरंगाबादेत कोरोनाचे आणखी दोन बळी, मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2020 09:24 IST2020-05-13T09:23:06+5:302020-05-13T09:24:00+5:30

या दोन मृत्यूमुळे शहरात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या आता १७ झाली आहे.

Coronavirus: Shocking! Two more deaths of corona in Aurangabad, report positive after death | Coronavirus : धक्कादायक ! औरंगाबादेत कोरोनाचे आणखी दोन बळी, मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह

Coronavirus : धक्कादायक ! औरंगाबादेत कोरोनाचे आणखी दोन बळी, मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह

औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाचे आणखी दोन बळी गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली. घाटी रुग्णालयात एका ९४ वर्षीय वृद्धेचा आणि ५६ वर्षीय महिलेचा मृत्यूनंतर अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती मेडिसीन विभागप्रमुख डॉ. मीनाक्षी भट्टाचार्य यांनी दिली.या दोन मृत्यूमुळे शहरात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या रुग्णांची संख्या आता १७ झाली आहे.

बीड बायपास परिसरातील अरुणोदय कॉलनी येथील ९४ वर्षीय वृद्धेला मंगळवारी दुपारी ४.४५ वाजता घाटीत दाखल करण्यात आले होते. त्यांना भरती करण्यात आले तेव्हा त्या बेशुद्ध होत्या. दुपारी ५ वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्याचा कोरोनाचा अहवाल रात्री ८ वाजता पॉझिटिव्ह आला.

तर हुसेन कॉलनी येथील ५६ वर्षीय महिलेला मंगळवारी सकाळी १०.१७ वाजता घाटीत दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना दुपारी १२.२० वाजता मृत्यू झाला. त्यांची अहवाल रात्री ८ वाजता पॉझिटिव्ह आला

Web Title: Coronavirus: Shocking! Two more deaths of corona in Aurangabad, report positive after death