CoronaVirus : धक्कादायक! सात वर्षीय मुलीला कोरोनाची बाधा, पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2020 13:46 IST2020-04-05T13:39:29+5:302020-04-05T13:46:04+5:30

coronavirus : घाटी रुग्णालयात सिव्हिटीएस इमारतीत शुक्रवारपासून उपचार घेत असलेल्या दोघांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

CoronaVirus: Shocking! Corona obstruction to seven-year-old girl, five reported positive rkp | CoronaVirus : धक्कादायक! सात वर्षीय मुलीला कोरोनाची बाधा, पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

CoronaVirus : धक्कादायक! सात वर्षीय मुलीला कोरोनाची बाधा, पाच जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

औरंगाबाद : शहरातील पाच जणांचे कोरोना अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्हात कोरोनाचा विळखा घट्ट झाला आहे.

घाटी रुग्णालयात सिव्हिटीएस इमारतीत शुक्रवारपासून उपचार घेत असलेल्या दोघांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यात हिमायतनगर, जलाल कॉलनी ७९ वर्षीय आणि सातारा परिसरातील ५२ वर्षीय रुग्णाचा समावेश आहे. 

जिल्हा रुग्णालयात दाखल दोन कोरोना संशयित रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे घाटी प्रयोगशाळेने संकेत शनिवारी रात्री उशिरा दिले होते. या दोघांत आरेफ कॉलनीतील एका ४५ वर्षीय महिलेचा आणि बीड बायपास परिसरातील एका ३८ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. यामुळे या दोघांवर पॉझिटिव्ह रुग्णांवर केले जाणारे उपचार सुरू करण्यात होते.

या दोघांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर खाजगी रुग्णालयात दाखल सात वर्षाची मुलगीही कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी सांगितले.

Web Title: CoronaVirus: Shocking! Corona obstruction to seven-year-old girl, five reported positive rkp