शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
3
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
4
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
5
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
6
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
7
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
8
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
9
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
10
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
11
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

CoronaVirus : धक्कादायक ! कोरोनामुक्त झालेले ७९ वर्षीय ज्येष्ठ पुन्हा पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 9:28 PM

जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल

ठळक मुद्देकोरोनामुक्त रुग्ण परत पॉझिटिव्ह झाल्याची शहरातील पहिलीच घटना

औरंगाबाद : जलाल कॉलनी येथील कोरोनावर विजय मिळविणाऱ्या ७९ वार्षीय ज्येष्ठाचा अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी सांगितले. 

कोरोनाचा ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक धोका असल्याचे सांगितले जाते. परंतु शहरातील जलाल कॉलनीतील ७९ वर्षीय ज्येष्ठाने कोरोनावर विजय मिळविला होता. जिल्हा रुग्णालयातील १५ दिवसांच्या उपचारानंतर या ज्येष्ठ नागरिकासह कोरोनावर विजय मिळविणाऱ्या ७ रुग्णांना २० एप्रिल रोजी रुग्णालयातून सुटी देण्यात आली. शहरात आतापर्यंत २४ पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनामुक्त झाले. जलाल कॉलनीतील ७९ वर्षीय रुग्ण शहरात आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांत सर्वात ज्येष्ठ ठरले होते.हे ज्येष्ठ नागरिकानी खुलताबाद येथील ग्रामीण रुग्णालयात २५ वर्षांपूर्वी सहायक अधीक्षक म्हणून सेवा बजावली आहे. रुग्णालयातून गेल्यानंतर अवघ्या ८ दिवसांतच त्यांच्यात पुन्हा कोरोनाची लक्षणे दिसून आली. त्यामुळे त्यांचा स्वब घेण्यात आला होता. त्याचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात पुन्हा एकदा उपचार करण्यात येत आहे, असे डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी सांगितले. 

शहरात प्रथमच असे घडलेअन्य काही शहरात कोरोनामुक्त झालेले रुग्ण पुन्हा पॉझिटिव्ह झाल्याचे यापूर्वी समोर आले होते. परंतु शहरात पहिल्यांदा असा प्रकार समोर आला. अन्य कोरोनामुक्त रुग्णांकडेही लक्ष शहरात कोरोनामुक्त झालेल्या अन्य रुग्णांकडे लक्ष दिले जात आहे. त्यांना १४ दिवसांचा होम क्वारंटाईनचा सल्ला देण्यात आला आहे, असे डॉ. प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद