CoronaVirus : औरंगाबादला धक्का! शहरात आणखी तिघे कोरोना पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 15:38 IST2020-04-07T15:37:32+5:302020-04-07T15:38:09+5:30
कोरोनाची लागण झालेल्या संपर्कातील तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह

CoronaVirus : औरंगाबादला धक्का! शहरात आणखी तिघे कोरोना पॉझिटिव्ह
- संतोष हिरेमठ
औरंगाबाद : शहरात आणखी तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोना लागण झालेल्या रुग्णाच्या संपर्कातील हे तिन्ही रुग्ण आहेत. यामुळे शहरातील कोरोनाची रुग्ण संख्या १४ वर गेली आहे.
शहरात कोरोनाचा विळखा वाढत असून आता कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील व्यक्तींना याची लागण होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरात यापूर्वी ११ रुग्ण आढळून आले आहेत. आज दोन कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील व्यक्तींचा अहवाल प्राप्त झाला असून तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यात एक व्यक्ती जलाल कॉलनी येथील असून इतर दोन अन्य एका भागातील रुग्णाचे नातेवाईक असल्याची माहिती आहे. यामुळे शहरातील कोरोनाग्रस्तांची संख्या १४ वर पोहनचली असून शहरावसीयांसाठी हे धक्कादायक आहे.