CoronaVirus : औरंगाबादमध्ये कोरोनाचा आठवा बळी; ४७ वर्षीय वाहनचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2020 10:13 IST2020-05-01T10:12:32+5:302020-05-01T10:13:59+5:30
२७ एप्रिलपासून त्यांच्यावर घाटी रुग्णालायातील कोव्हीड क्रीटीकल केअरच्या आयसीयूत त्यांच्यावर उपचार सुरु होते.

CoronaVirus : औरंगाबादमध्ये कोरोनाचा आठवा बळी; ४७ वर्षीय वाहनचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू
औरंगाबाद : कोरोनाबाधित गारखेडा येथील गुरुदत्त नगर ४७ वर्षीय वाहन चालकाचा शुक्रवारी (दि. १) सकाळी ६.२० वाजता मृत्यू झाला. २७ एप्रिलपासून त्यांच्यावर घाटी रुग्णालायातील कोव्हीड क्रीटीकल केअरच्या आयसीयूत त्यांच्यावर उपचार सुरु होते. या मृत्यूमुळे बाधीतांच्या मृत्यूचा आकडा आठ झाला आहे. अशी माहीती रुग्णालयाचे माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली.
गेल्या सात दिवसांपुर्वी ताप सर्दी खोकला असल्याने वाहनचालकाने खाजगी रुग्णालयासह जिल्हा रुग्णालयात उपचार घेतले. पहिला स्वॅब निगेटीव्ह आल्यावर जिल्हा रुग्णालयातून घाटीत शिफ्ट करण्यात आले. सात दिवसांपासून ताप, सर्दी, खोकला व गेल्या चार दिवसांपासून श्वास घ्यायला त्रास होता. तीव्र लक्षणे असल्याने त्यांची दुसर्यांदा स्वॅब घेण्यात आला. त्याचा अहवाल पॉझीटीव्ह आला. शर्थीचे प्रयत्न करुनही त्यांचा शुक्रवारी मृत्यू झाला. त्यांना दोन्ही बाजुने निमोनीया झाला होता. त्यामुळे श्वास घेण्यास अडचण येत असल्याने कृत्रीमश्वाशोच्छ्वास देण्यात आला होता. कोरोनासह एक्यूट रेस्पीरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम ने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉ. अरविंद गायकवाड यांनी कळवले आहे. शहरातील आतापर्यंतच्या मृत्यूत पन्नाशीच्या आतील हा पहिला मृत्यू आहे. एकीकडे पॉझीटीव्ह रुग्णांचा आकडा १७७ वर पोहचला.२३ जण कोरोनामुक्त झाले. एका वृद्धाला कोरोनामुक्त झाल्यावर पुन्हा कोरोनाची बाधा झाली. तर दुसरीकडे मृत्यूचा आकडा आठवर पोहचल्याने चिंता व्यक्त होत आहे.