coronavirus : जळगावच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा उपचारादरम्यान औरंगाबादेत मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 16:33 IST2020-05-25T16:22:16+5:302020-05-25T16:33:10+5:30
सदर रूग्ण पॉझिटिव्ह असल्याचे जळगाव येथे निदान झाले होते.

coronavirus : जळगावच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा उपचारादरम्यान औरंगाबादेत मृत्यू
ठळक मुद्देप्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी औरंगाबादेत
औरंगाबाद : शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना सोमवारी जळगाव येथील ९० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. सदर रूग्ण पॉझिटिव्ह असल्याचे जळगाव येथे निदान झाले होते.
या रुग्णाची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी औरंगाबादेत संदर्भित करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल झाल्यापासून रुग्णाची प्रकृती चिंताजनक होती. अखेर उपचार सुरू असताना या रुग्णाने सोमवारी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.