CoronaVirus : धक्कादायक ! औरंगाबादेत कोरोनाचा सहावा बळी, किलेअर्क येथील ६० वर्षीय महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 13:39 IST2020-04-27T13:36:58+5:302020-04-27T13:39:09+5:30
घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना किलेअर्क येथील ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

CoronaVirus : धक्कादायक ! औरंगाबादेत कोरोनाचा सहावा बळी, किलेअर्क येथील ६० वर्षीय महिलेचा मृत्यू
औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाचा सोमवारी सहावा बळी गेला. घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना किलेअर्क येथील ६० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.
सदर महिला २४ एप्रिल रोजी घाटीत दाखल झाली होती. २५ एप्रिल रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. उपचार सुरू असताना सोमवारी १२.३० मिनिटांनी त्यांचा मृत्यु झाला,अशी माहिती डॉ. अरविंद गायकवाड यांनी दिली.