CoronaVirus : औरंगाबादमध्ये कोरोनाचा कहर ; रुग्ण संख्येने ओलांडले अर्धशतक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 08:04 IST2020-04-26T08:04:24+5:302020-04-26T08:04:59+5:30
शहरात आणखी दोन पॉझिटिव्ह, रुग्णसंख्या ५१ वर

CoronaVirus : औरंगाबादमध्ये कोरोनाचा कहर ; रुग्ण संख्येने ओलांडले अर्धशतक
औरंगाबाद : औरंगाबादेत कोरोनाने रविवारी सकाळी अर्धशतकाचा आकडा ओलांडला. शहरात आणखी दोन पॉझिटिव्ह आढळले असून, आता शहरातील रुग्णसंख्या ५१ वर गेली.
आसेफिया कॉलनी आणि समतानगर येथील दोन महिलांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. ३५ आणि ६५ वर्षाच्या या महिला आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी दिली.
शहरात गेल्या आठ दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. शनिवारी सकाळी तीन कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर सायंकाळी आणखी दोन रुग्णांची भर पडली होती. यामुळे शहरातील कोरोना बाधितांची संख्या ४९ वर गेली. आता रविवारी सकाळी आणखी दोन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यामुळे शहरातील रुग्णसंख्या ५१ वर गेली आहे.