coronavirus : औरंगाबादेत कोरोनाचा ६६ वा बळी; ७२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2020 10:33 IST2020-05-28T10:32:53+5:302020-05-28T10:33:34+5:30

खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

coronavirus: 66th death of coronavirus in Aurangabad; 72-year-old dies | coronavirus : औरंगाबादेत कोरोनाचा ६६ वा बळी; ७२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

coronavirus : औरंगाबादेत कोरोनाचा ६६ वा बळी; ७२ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

औरंगाबाद : शहरात खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान सादातनगर येथील ७२ वर्षीय कोरोनाबाधीत वृद्धाचा बुधवारी रात्री मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. हा औरंगाबादेतील कोरोनाचा ६६ वा बळी ठरला आहे.

सदर वृद्धाला २५ मे रोजी उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणी अंती बुधवारी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर बुधवारी रात्री २०.४५ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला. 'कोव्हिड न्यूमोनिया विथ मल्टिऑर्गन फेल' असे मृत्यूचे कारण डॉक्टरांनी सांगितले.

Web Title: coronavirus: 66th death of coronavirus in Aurangabad; 72-year-old dies