शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

coronavirus : औरंगाबादमध्ये कोरोनाचा ५६ वा बळी; मेहमुदपुरा येथील महिलेचा मृत्यू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 7:51 PM

महिलेस २८ एप्रिल रोजी रुग्णालयात भरती करण्यात आले होते.

औरंगाबाद : खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या महेमुदपुरा येथील ५५ वर्षीय महिलेचा सोमवारी दुपारी १ वाजता मृत्यु झाला. यामुळे शहरातील कोरोनाबाधितांचा आतापर्यंतच्या बळींचा आकड ५६ वर गेला आहे. 

महेमुदपुरा येथील ५५ वर्षीय महिलेस २८ एप्रिल रोजी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांचा २९ एप्रिल रोजी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना कृत्रीम श्वास देऊन उपचार सुरु होते. सोमवारी दुपारी कोविडमुळे एका पेक्षा जास्त अवयवांचे काम प्रभावित झाल्याने त्यांचा मृत्यु झाला. सोबत मधुमेह व उच्चरक्तदाबही होता असे खाजगी डॉक्टरांनी कळवले आहे.

दरम्यान, कोरोनाबधित गंभीर असलेल्या चार महिलांसह एका पुरुषाचा रविवारी सायं. ९.३० ते सोमवारी सकाळी ६.३० दरम्यान ५ मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. यात सिल्लोड, कटकट गेट, रोहीदासनगर, कैलासनगर येथील महिलांचा तर न्यायनगरातील पुरुषाचा समावेश आहे.  कटकटगेट येथील ५५ वर्षीय महिलेचा रविवारी रात्री साडेनऊ वाजता मृत्यू  झाला. न्यायनगर, गारखेडा येथील ४८ वर्षीय पुरुषाचा रविवारी रात्री ९.३५ वाजता,  रोहिदासनगर येथील ३४ वर्षीय महिलेला मध्यरात्री एक वाजता, कैलास नगर येथील ७५ वर्षीय महिलेचा सोमवारी पहाटे ३.१५ वाजता मृत्यू  झाला. तर सिल्लोड येथील अब्दलशहा नगर येथील ५५ वर्षीय महिलेचा सोमवारी सकाळी साडेसहा वाजता मृत्यू  झाल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले.

शहरात १३०१ रुग्णसोमवारी (दि २५) सकाळच्या सत्रात १६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामुळे एकूण संख्या १३०१ झाली आहे. शहरातील  सुभाषचंद्र बोस नगर ( एन ११, हडको)- ४, भवानी नगर- २, रोशन गेट -१ , हुसेन कॉलनी-१,  बायजीपुरा- १, इटखेडा (पैठण रोड)- १, अल्तमश कॉलनी- १, जवाहर नगर (गारखेडा परिसर ) -१, शाह बाजार-१,  मयूर नगर ( एन-6, सिडको)- १, राम नगर ( एन २ ) - १, गजानन मंदिर परिसर - १ या भागात कोरोनाबाधित आढळून आले. यामध्ये १० महिला आणि ६ पुरूष रुग्णांचा समावेश आहे, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAurangabadऔरंगाबाद