coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील ३ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 16:27 IST2020-08-12T16:24:32+5:302020-08-12T16:27:03+5:30
जिल्ह्यात सध्या ४०२९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

coronavirus : औरंगाबाद जिल्ह्यातील ३ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू
औरंगाबाद : घाटी रुग्णालयात उपचार सुरू असताना बदनापूर-जालना येथील एक आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ३ कोरोनाच्या रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित मयत रुग्णांची संख्या ५६५ झाली आहे.
शास्त्रीनगर-सिल्लोड येथील ६२ वर्षीय पुरुष, खडकेश्वर येथील ५९ वर्षीय महिला , रांजणगाव येथील ५५ वर्षीय पुरुष आणि बदनापूर-जालना येथील ७० वर्षीय पुरुष रुग्णाचा घाटीत उपचार सुरू असताना मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.
आज १२३ बाधितांची वाढ
बुधवारी जिल्ह्यातील १२३ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १७४२७ एवढी झाली आहे. त्यापैकी १२८३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत ५६५ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून सध्या ४०२९ रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.