शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
3
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
4
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
5
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
6
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
7
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
8
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
9
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
10
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
11
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
12
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
13
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
14
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
15
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
16
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
17
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
18
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
19
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत

corona virus : डॉक्टर , लसीकरणानंतर किती दिवस मद्यपान करायचे नाही ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2021 1:33 PM

पहिला डोस बहुतांश नागरिकांनी घेतला आणि लस घेतल्यावर किमान सहा आठवडे तरी मद्यपान करू नये तर अनेक जणांचे म्हणणे आहे, की दारूविषयी कुणाचा शब्द प्रमाण मानावा, किंवा लेखी काहीही नाही.

ठळक मुद्दे अतिमद्य सेवन आरोग्यासाठी घातकवैद्यकीय अधिकाऱ्यांचे मत

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतल्यानंतर काही दिवस मद्यपान करायचे नाही, अतिमद्यपान आरोग्यास घातक आहे, असे संदेश समाजमाध्यमावर फिरत आहे; परंतु लस घेण्यापूर्वी व घेतल्यानंतर किती दिवसांनी घ्यावी, की घेऊ नये याची अधिकृतपणे परिपत्रक काढून कुणीही माहिती दिलेली नाही. काहीही होऊ देत दारू पिणाऱ्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढली आहे.

पहिल्या टप्प्यात कोरोना योद्धे, आरोग्यसेवेतील अधिकारी, कर्मचारी, पोलिसांना लस देण्यात आली. अनेकांनी पहिली लस घेतली आता दुसरी लस घेण्याची तयारी सुरू झाली आहे. पहिला डोस बहुतांश नागरिकांनी घेतला आणि लस घेतल्यावर किमान सहा आठवडे तरी मद्यपान करू नये तर अनेक जणांचे म्हणणे आहे, की दारूविषयी कुणाचा शब्द प्रमाण मानावा, किंवा लेखी काहीही नाही. त्यावर कुणीच बोलले नाही तर काहीचे म्हणणे आहे की, खुशाल बिनधास्त ढोसा कोरोनाचा तुमच्यावर काही परिणाम होणार नाही. अशा वेेगवेगळ्या मतांमुळे काही नागरिकांत संभ्रमावस्था आहे. दारू घेऊन कष्ट करणाऱ्यांना काही कोरोना झाला नाही, त्याचा कोणी विचार केलाय का, त्याला कोरोना घाबरतोय काय, रस्त्यावर राहतो, दिले तो खातोय असे म्हणून दारू पिणाऱ्यांची दारूच्या अड्ड्यांवर झुंबड होत असल्याने ‘ ब्रेक द चेन’मध्ये शासनाने दारूची दुकानेदेखील महिनाभर बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.

दारूचा महापूर...औरंगाबाद शहरात महिनाभरात विदेशी दारूची तीन लाख लिटरची विक्री होते, दीड लाख लिटर देशी आणि एक लाख लिटरच्या दरम्यान बिअरची विक्री होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते; परंतु सध्या मद्याच्या वाढीव एमआरपीचा विषय असल्याने अधिक माहिती कार्यालयाकडून मिळत नाही.

लस घेताय तर दारू घेऊ नका....जीवापेक्षा दारू पिणे महत्त्वाचे आहे काय, कोरोना पळवायचा असेल तर दारू पिऊन पळणार आहे का, असा सवाल करून दुसरे तज्ज्ञ म्हणाले लस घेण्यापूर्वी तीन दिवस आणि नंतर तीन दिवस दारू पिणे योग्य नाही. दारू पिल्याने त्याचा काय परिणाम होतो हे त्यांना सांगता आले नाही, परंतु ते योग्य नसल्याचे मत एका डॉक्टराने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर मांडले.

अतिमद्य सेवन घातकच...शरिरातील प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आहार चांगला ठेवावा, कोरोना प्रतिबंधक लस आरोग्यासाठी घ्यायलाच हवी, कारण कोरोनापासून तुम्हाला संरक्षण मिळणार आहे. काही तरी कारणे सांगून दारू पिणे हे धोक्याचे आहे. अतिमद्य सेवनाने शरीरातील अवयव निकामी होतात. हे लक्षात घेतले पाहिजे. दारू पिणे हे आरोग्यासाठी घातकच आहे, कोरोनात दारू प्यावी की नाही प्यावी याविषयी कोणताही लेखी आदेश प्राप्त झालेला नाही. याविषयी वेगवेगळे मतमतांतरे आहेत.- डॉ. नीता पाडळकर (मुख्य आरोग्य अधिकारी मनपा)

कोरोनामुळे दुकाने बंद...वर्षभरात झालेली मद्यविक्रीची मार्च एन्डची आकडेवारी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात प्राप्त होते परंतु कोरोनामुळे दुकाने बंद करण्यात आली असून, आकडेवारी आलेली नाही. त्यामुळे किती विक्री झाली याचा आकडा सांगता येणार नाही. महिनाभर बंद असल्याने कार्यालयात माहिती आली नाही, दुकाने उघडल्यानंतर माहिती देता येईल. - सुधाकर कदम, अधीक्षक, उत्पादन शुल्क विभाग

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याAurangabadऔरंगाबाद