CoronaVirus : औरंगाबादमध्ये कोरोनाचा १३ वा बळी; ५० वर्षीय व्यक्तीचा घाटीत मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 10:04 IST2020-05-10T10:03:33+5:302020-05-10T10:04:10+5:30

औरंगाबादमध्ये रुग्णसंख्या ५४६ झाली आहे

Corona Virus: 13th death of Corona in Aurangabad; 50-year-old dies in Ghati Hospital | CoronaVirus : औरंगाबादमध्ये कोरोनाचा १३ वा बळी; ५० वर्षीय व्यक्तीचा घाटीत मृत्यू

CoronaVirus : औरंगाबादमध्ये कोरोनाचा १३ वा बळी; ५० वर्षीय व्यक्तीचा घाटीत मृत्यू

औरंगाबाद  ः कोरोना पाॅझीटीव्ह असलेल्या रोशन गेट येथील 50 वर्षीय व्यक्तीचा घाटीच्या डेडीकेटेड कोव्हीड हाॅस्पीटल येथे मृत्यू झाला. त्यामुळे शहरातील मृत्यूचा आकडा 13 झाला आहे. अशी माहीती घाटीचे माध्यम समन्वयक डाॅ. अरविंद गायकवाड यांनी दिली.

जिल्हा रुग्णालयात 2 मे रोजी या रुग्णाला कोव्हीड पाॅझीटीव्ह आल्याने भरती करण्यात आले होते. मात्र, शाच्छोस्वासाचा त्रास वाढल्याने त्यांना घाटीच्या डेडीकेटेड कोव्हीड हाॅस्पीटल येथे 3 मे रोजी हलवण्यात आले होते. त्यांना कोरोनामुळे निमोनिया झाला होता. तीव्र मधुमेह, मुत्रपिंड निकामी झाल्याने त्यांना चार डायलेसीसही करण्यात आले होते. मात्र, त्यांच्याकडून उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही. 6 मेपासून त्यांना कृत्रिम श्वाच्छोस्वास देण्यात आलेला होते. सकाळी 7.50 ला त्यांचा मृत्यू झाल्याची माहीती औषधवैद्यक विभागप्रमुख डाॅ. मिनाक्षी भट्टाचार्य यांनी दिली. घाटीतील हा अकरावा तर शहरातील हा 13 मृत्यू ठरला आहे.  

Web Title: Corona Virus: 13th death of Corona in Aurangabad; 50-year-old dies in Ghati Hospital