शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
11
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
12
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
13
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
14
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
15
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
16
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
17
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
18
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
19
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
20
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती

कोरोना सेंटरमध्ये रुग्णावर बलात्काराचा प्रयत्न करणारा डॉक्टर बडतर्फ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 7:43 PM

Doctor attempted rape on corona positive patient महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोग्य अधिकारी मनीषा भोंडवे यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले.

ठळक मुद्देप्रकरण पोहचले विधानसभेपर्यंतपोलिसांनी घेतली सखोल माहिती

औरंगाबाद : महापालिकेच्या पदमपुरा येथील कोरोना उपचार केंद्रात मंगळवारी मध्यरात्री पॉझिटिव्ह आलेल्या महिला रुग्णावर बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या कंत्राटी डॉक्टरला गुरुवारी महापालिका प्रशासनाने तडकाफडकी बडतर्फ केले. 

महापालिकेच्या पद्मपुरा येथील कोविड केअर सेंटरमध्ये मंगळवारी रात्री २ वाजता हा प्रकार घडला होता. बुधवारी महापालिका प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी आरोग्य अधिकारी मनीषा भोंडवे यांना चौकशी अधिकारी म्हणून नियुक्त केले. भोंडवे यांनी गुरुवारी सकाळी चौकशी अहवाल प्रशासक यांना सादर केला. अहवालात पदमपुरा येथे आयुष डॉक्टर संदीप पंजरकर हा सीसीटीव्हीत महिलेशी लगट करताना अनेकदा दिसून आला. महिलेने दिलेल्या माहितीवरून आणि परिस्थितीजन्य पुराव्यावरून चौकशी अधिकारी यांनी डॉक्टर पंजरकर दोषी असल्याचे अहवालात नमूद केले. या अहवालावरून प्रशासक पांडेय यांनी तडकाफडकी डॉक्टर पंजरकरला बडतर्फ केले.नेमका प्रकार काय झाला

डॉ. सचिन पंजरकर याची गतवर्षी मे महिन्यात नेमणूक केली होती. तो पदमपुरा येथे कार्यरत होता. दरम्यान २३ फेब्रुवारी महिला पदमपुरा येथील कोविड केअर सेंटरमध्ये २५ वर्षीय महिला दाखल झाली होती. तिला पाच मार्चला डिस्जार्ज दिला जाणार होता. मात्र ही महिला डिस्चार्जची मागणी करत होती. त्यामुले पंजरकर याने रात्री दोन वाजता महिलेला मोबाईलवरून संपर्क साधत तुम्हाला डिस्चार्ज द्यायचा आहे, केबिनमध्ये या असे सांगितले. यावेळी पंजरकर यांनी आपल्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महिलेने महापालिका प्रशासनाकडे केली होती. मात्र बदनामीच्या भीतीने महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली नाही हे विशेष.

विधिमंडळापर्यंत गेले प्रकरण महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये महिलेवर बलात्काराचा प्रयत्न झाल्याचे प्रकरण विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संबंधित डॉक्टराला महापालिका प्रशासनाने निलंबित केल्याचे उत्तर दिले.  त्यानंतर आ.अतुल सावे यांनी महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ प्रशासनाबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

डॉक्टर आणि रुग्ण यांची जुनी ओळखमहापालिकेचा कंत्राटी डॉ. पंजरकर व संबंधित महिला एकमेकांच्या ओळखीचे आहेत. दोघांनी डॉक्टरच्या केबिनमध्ये ४० मिनिटे गप्पा मारल्याचे सीसीटीव्हीमधून समोर आले आहे, असे डॉ. पाडळकर यांनी सांगितले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादcorona virusकोरोना वायरस बातम्या