शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

एलआयसी आणि देगलूर कॉलेजला ग्राहक मंचाचा दणका

By admin | Updated: July 9, 2014 00:12 IST

नांदेड : विमा रकमेचा क्लेम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या एलआयसीला ५ लाख रुपयांचा विमा रक्कम तसेच नुकसान भरपाईपोटी २५ हजार रुपये निकालापासून ३० दिवसांत द्यावेत असा आदेश ग्राहक मंचाने दिला आहे़

नांदेड : विमा रकमेचा क्लेम देण्यास टाळाटाळ करणाऱ्या एलआयसीला ५ लाख रुपयांचा विमा रक्कम तसेच देगलूर महाविद्यालयाने दिलेल्या त्रुटीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपोटी २५ हजार रुपये निकालापासून ३० दिवसांत द्यावेत असा आदेश ग्राहक मंचाने दिला आहे़मयत सुधीर शेट्टी हे देगलूर महाविद्यालय देगलूर येथे कनिष्ठ प्राध्यापक म्हणून कार्यरत होते़ त्यांनी एलआयसीकडून जीवन सरल नावाची पॉलिसी १८ आॅगस्ट २००९ रोजी घेतली होती़ पॉलिसीच हप्ता पगारीतून कपात करण्याबाबत त्यांनी महाविद्यालयाला कळविले होते़ महाविद्यालयाने या पॉलिसीचे दोन-तीन प्रिमियम पगारातून कपात केले़ मात्र नोटीस किंवा कल्पना न देता पुढे प्रिमियम कपात बंद केली़ तसेच सदरील कपात बंद झाल्याची एलआयसीनेही अर्जदार शेट्टी यांना कळविले नाही़ २३ फेब्रुवारी २०१० रोजी सुधीर शेट्टी यांचा अपघाती मृत्यू झाला़ मयताच्या वारसाने विमा रकमेसाठी अर्ज केला असता एलआयसीने उपरोक्त कारणास्तव विमा नामंजूर केला़ या संदर्भात वारस सुलक्षणा शेट्टी यांनी जिल्हा ग्राहक मंचाकडे तक्रार केली़ मंचाने तिन्ही पक्षाचा पुरावा तपासून तसेच युक्तीवाद ऐकून एलआयसीला विमा रक्कम ५ लाख रुपये तसेच त्रुटीमुळे झालेली नुकसान भरपाई म्हणून देगलूर महाविद्यालयाने निकाल लागल्यापासून २५ हजार रुपये द्यावेत असा आदेश दिला़ अर्जदाराची बाजू अ‍ॅड़सुरेश पन्नासवाड आणि संतोष जोगदंड यांनी मांडली़(वार्ताहर) महाविद्यालयाने या पॉलिसीचे दोन-तीन प्रिमियम पगारातून कपात केले़ मात्र नोटीस किंवा कल्पना न देता पुढे प्रिमियम कपात बंद केली़ कपात बंद झाल्याचे एलआयसीनेही शेट्टी यांना कळविले नाही़ २३ फेब्रुवारी २०१० रोजी शेट्टी यांचा अपघाती मृत्यू झाला़